1 min read

जगद्गुरू तुकोबांच्या बीज उत्सवाचा काल्याच्या कीर्तनाने समारोप…

Loading

जगद्गुरू तुकोबांच्या बीज उत्सवाचा काल्याच्या कीर्तनाने समारोप…

कुणबी पाटील समाजातील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा…

धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर

धरणगाव — येथील समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने मागील ३५ वर्षांपासून संत तुकाराम महाराज बीजनिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.२ मार्च ते ९ मार्च २०२३ दरम्यान हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न झाले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या संगीतमय चरित्राचे पारायण ह.भ.प. कैलास महाराज टेकवाडेकर यांच्या मधुर वाणीतून श्रोत्यांना श्रवणाचा लाभ मिळाला. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला राजेंद्र शंकर पाटील यांचे तर संगीतमय चरित्रासाठी भिमराज अर्जुन पाटील यांचे आर्थिक सहकार्य लाभले. दि. २ मार्च ला ह.भ.प.आदिनाथ महाराज जळकेकर, ३ मार्च ह.भ.प.आनंद महाराज बोरकुंडकर, ४ मार्च ह.भ.प.माधव महाराज कन्हेरेकर, ५ मार्च ह.भ.प.अतुल महाराज बेटावदकर, ६ मार्च ह.भ.प.मनोज महाराज कुलकर्णी जळगावकर, ७ मार्च ह.भ.प.दिनेश महाराज चिखलीकर, ८ मार्च ह.भ.प.कैलास महाराज टेकवाडेकर आणि ९ मार्च ला सप्ताहाचे संयोजक ह.भ.प.चत्रभुज महाराज (प्रा.सी.एस.पाटील सर) धरणगावकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहाच्या ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेचा इतिहास, समाजाची जागा, तुकोबाराय अभ्यासिका याचा उल्लेख प्रास्ताविकात करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने आलेल्या कीर्तनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, वीणावादक, हार्मोनियम वादक व सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जगतगुरू संत तुकाराम महाराज बीजनिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षी देखील इ.१० वी, १२ वी तसेच उच्चशिक्षित गुणवंत विद्यार्थांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. लहान माळी वाडा परिसरातील संत तुकाराम महाराज चौक ( माळी व पाटील समाज मढी ) येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. सप्ताहाच्या समाप्तीनंतर गावातील तसेच तालुक्यातील असंख्य भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन समस्त कुणबी पाटील पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सचिव महेश्वर पाटील, सहसचिव दिनेश पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, जेष्ठ संचालक माधवराव पाटील, चुडामण पाटील, राजेंद्र पाटील, दत्तू पाटील, मोहन पाटील, कैलास पाटील, किशोर पाटील, गणेश पाटील, अशोक पाटील, वाल्मिक पाटील, मंगेश पाटील, परशुराम पाटील, आनंद पाटील, जितेंद्र पाटील, शिपाई अशोक झुंजारराव यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.संत तुकाराम महाराज बीज उत्सव समितीचे सदस्य समाधान पाटील, पंकज पाटील, राहुल पाटील, महेश पाटील, मुकेश पाटील, अमोल पाटील, परशुराम पाटील, नकुल पाटील, जितेंद्र पाटील, सागर पाटील, गोपाल पाटील, गणेश पाटील, श्याम पाटील, अक्षय पाटील, रितेश पाटील, रोहित पाटील, दिगंबर पाटील, मनीष पाटील, भूषण पाटील, पवन पाटील, जयेश पाटील, हिमांशू पाटील, समाधान पाटील, सागर पाटील, गोकुळ पाटील, कमलेश पाटील, पवन पाटील, अतुल पाटील, तुषार पाटील, सतीश पाटील, अनुप पाटील, पितांबर पाटील, रोहित पाटील, पवन पाटील या सर्व युवकांनी तसेच सर्व लहान माळी वाडा परिसरातील सर्व पाटील, माळी, चौधरी, मराठे समाज बांधवांनी ज्ञात अज्ञात सर्वांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मणराव पाटील यांनी तर आभार प्रदर्शन गणेश पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *