माणुसकी समुहातर्फे संत सेना महाराज यांची जयंती साजरी
![]()

माणुसकी समुहातर्फे संत सेना महाराज यांची जयंती साजरी
दि. 8/3/2023 रोजी जटवाडा रोड स्थित सारा वैभव परिसरात माणूसकी समुहातर्फे श्री संत सेना महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली तसेच जागतिक महिला दिना निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल टाकुन बेवारसाच्या हितासाठी काम करनाऱ्या समाजसेविका सौ.पुजा यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी समाजसेवक सुमित पंडीत यांनी संतसेना महाराज यांच्या जिवनावर प्रकाश टाकला, सुमित पंडीत या प्रसंगी बोलतांना म्हणाले की संतसेना महाराजांनी आपला व्यवसाय सांभाळून समाजाला अध्यात्मिक व सामाजिक कर्तव्याकडे वळवले.
ते पुढे म्हणतात संतसेना महाराज व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या शिकवणीस अनुसरून समाजकार्याची प्रेरणा मिळाली , अशा जयंत्या पुण्यतिथ्या ह्या त्यांचे विचार समाजकार्याचे नवे बळ देतात.याप्रसंगी समाजसेवक सुमित पंडित,रोहित तारे,मनोज बेलकर,सुधाकर हिवरे,
समाजसेविका पुजा पंडीत,धनश्री पंडित,राम पंडीत हे उपस्थित होते.

