1 min read

एस एन कोळी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !…

Loading

एस एन कोळी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !…

मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान !….

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे उपक्रमशील शिक्षक एस एन कोळी यांना नुकताच जळगाव येथील अल्पबचत भुवन येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या संस्थेच्या वतीने एस एन कोळी यांची शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय गौरव पुरस्कार – २०२३ देऊन सन्मानित करण्यात आले होते.
आज ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील मुख्याध्यापक जे एस पवार यांच्या हस्ते पुरस्कारार्थी एस एन कोळी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंदांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार, पर्यवेक्षक एम बी मोरे,ज्येष्ठ शिक्षक एस व्ही आढावे, पी डी पाटील, व्ही टी माळी, एच डी माळी, सी एम भोळे, श्रीमती व्ही पी वऱ्हाडे, नूतन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अतुल सूर्यवंशी, तुषार पाटील, अरूण शिरसाठ, अशोक पाटील, जीवन भोई, ग्रंथपाल गोपाल महाजन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *