2005 पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी बांधवांनी कोणत्याही परिस्थितीत पेपर स्वीकारायचे नाहीत-संगिताताई शिंदे
![]()

2005 पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी बांधवांनी कोणत्याही परिस्थितीत पेपर स्वीकारायचे नाहीत
इयत्ता दहावीच्या बोर्ड पेपर तपासणीवर फक्त 2005 पूर्वी कर्मचाऱ्यांनी 1982 ची जुनी पेन्शन मिळावी म्हणून आपण महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटीच्या माध्यमातून बहिष्कार टाकलेला आहे .त्यामुळे जुनी पेन्शन धारक कर्मचारी आपल्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. तरीही आपण 2005 पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी बांधवांनी कोणत्याही परिस्थितीत पेपर स्वीकारायचे नाहीत. पेपर तपासणीसाठी आपल्यातील मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी बोर्डाच्या वरिष्ठाला आपल्या बहिष्कार बाबतचे निवेदन देऊन पेपर तपासणीला स्पष्ट नकार द्यावयाचा आहे.
पण कोणत्याही परिस्थितीत आपण 2005 पूर्वी मुख्याध्यापक व शिक्षकांनी पेपर तपासणीसाठी पेपर घ्यावयाचे नाहीत. 2005 पूर्वी कर्मचाऱ्यांनी जरी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला, तरीही राज्य बोर्ड महामंडळ दहावीच्या बोर्डाचा निकाल लावूच शकणार नाहीत. त्यामुळे आपल्या जीवनमरणाचा प्रश्न शासनाला कोणत्याही परिस्थितीत सोडवावाच लागेल. बांधवानो अनेक आंदोलने केली परंतु 25000 पेन्शन पीडित बांधव कधीच एकत्र आला नाही. पण बहिष्काराचे आंदोलन हे घरी बसून फक्त विरोध करणे एवढेच आहे. त्यामुळे कोणतेही कार्यवाही शासन आपल्यावर करणार नाही आणि केलीच तर संघटना त्याच्या पाठीशी राहील. तसेच कार्यवाही शासनाला करावयाची असेल तर ती फक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वरच केली जाईल. त्यामुळे कोणीही घाबरून न जाता बहिष्कारचे आंदोलन यशस्वी करावयाचे आहे.
त्यासाठीच मुख्याध्यापक बांधवांनी कोणत्याही परिस्थितीत पेपर स्वीकारायचे नाहीत. तसेच सर्व शिक्षक बांधवांनी याच पद्धतीने अंमलबजावणी करावयाची आहे. कृपया कुणीही पेपर तपासणी घेऊ नये अन्यथा ही गद्दारी कायमचीच पेन्शनला वंचित ठेवणार आहे. त्यामुळे माझी पेन्शन माझी जबाबदारी या पद्धतीने हा बहिष्कार यशस्वी करूया ही विनंती धन्यवाद.
आपलेच पेन्शन पीडित बांधव व भगिनी
सौ संगीता ताई शिंदे( बोंडे) प्रा.दिलीप डोंगरे अहमदनगर
सुदेश जाधव कोल्हापूर

