1 min read

राजकारणात मतभेद असावे पण मनभेद नसावे…
पदवीधर आमदार सत्यजित तांबे
अमळनेरला सर्व पक्ष, संघटनेच्या वतीने झाला नागरी सत्कार

Loading

राजकारणात मतभेद असावे पण मनभेद नसावे…

पदवीधर आमदार सत्यजित तांबे

अमळनेरला सर्व पक्ष, संघटनेच्या वतीने झाला नागरी सत्कार

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- राजकारणात कोणताही मित्र कायमचा मित्र किंवा कोणताही शत्रू कायमचा शत्रू राहत नाही. राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत असे अमळनेरला नागरी सत्कार प्रसंगी पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले
ते पुढे म्हणाले की पदवीधर आमदारकी निवडणुकीत डॉ सुधीर तांबे यांनी केलेले कामे,व वडिलांचा आशीर्वाद व मामा बाळासाहेब थोरात यांचे पाठबळ व व सर्व ठिकाणी लोकांचे प्रेम पाठीशी असल्यामुळे विजय निश्चित झाला. पण आमदार झाल्यानंतर जबाबदारी वाढली आहे. निश्चितच लोकांच्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही, पदवीधर तरुणांचे प्रश्न , राज्यातील जुनी पेन्शनचा प्रश्न, आरोग्य, पाडळसरे धरणासाठी सुद्धा आमदार अनिल पाटील यांच्याकडून योग्य माहिती घेऊन तो सोडवण्यासाठी माझे निश्चित सहकार्य राहील यात शंका नाही.
आज विविध संघटनेच्या व पक्षाच्या वतीने माझा अमळनेरला नागरिक सत्कार करण्यात आला मी सर्वांचे मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी केले. पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांचे स्वागत व औक्षण खान्देश शिक्षण मंडळाचे विश्वस्त वसुंधराताई लांडगे, भगिनी मंडळाच्या आदर्श शिक्षिका रूपाली पवार ,सविता देशमुख, क्रांती साळुंखे यांनी केले.
सत्कारमूर्ती पदवीधर आमदार सत्यजित तांबे ,आमदार अनिल पाटील, डॉ बी. एस पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ,डॉ अनिल शिंदे, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, व्यासपीठावर होते. मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
कार्यक्रमात डॉ बी एस पाटील, आमदार अनिल पाटील जयवंतराव पाटील, प्राध्यापक संघटनेचे व भरवस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ संजय सोनवणे, शिक्षक भारतीचे आर जे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचा नागरी सत्कार आमदार अनिल पाटील ,माजी आमदार स्मिताताई वाघ ,डॉ बी एस पाटील, संदीप घोरपडे, मनोज पाटील, डॉ अनिल शिंदे, जयंतराव पाटील गोकुळ बोरसे ,विक्रांत पाटील ,विनोद कदम ,पत्रकार संजय पाटील, मयुर पाटील,सचीन साळुंखे यांनी सन्मानचिन्ह ,भव्य दिव्य हार देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे नवनिर्वाचित संचालक तुषार बोरसे यांचा सत्कार पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी शाल बुके देऊन केला.
यावेळी राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष श्यामभाऊ पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल पाटील, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बन्सीलाल भागवत, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे भूषण भदाणे,
सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक सतीश देशमुख,मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजीत शिंदे, सुभाष चौधरी, मुख्याध्यापक आर बी पाटील ,एल.जे चौधरी, , पी वाय पाटील, हिरामण कंखरे, भास्कर बोरसे, शशिकांत आढावे, चंद्रकांत कंखरे, पराग पाटील, मगन पाटील,पत्रकार जी.टी.टाक,आर.बी.शिंदे,प्रा.संजय बागूल,आर.टी बागूल, मतिमंद आश्रम शाळा व संस्थेचे अध्यक्ष योगेश महाजन,मुख्याध्यापक जाधव,
ओबीसी शिक्षक असोसिएशनचे ईश्वर महाजन ,पी.एस.विंचूरकर
मनोहर पाटील ,श्रावण तेले यांनी 1 नोव्हेंबर 2005 पर्यंत व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित जुनी पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने पदवीधर आमदार तांबे यांना निवेदन देण्यात आले. विविध संघटना, पक्ष व संस्थेच्या वतीने पदवीधर आमदारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले.

1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्ती व टप्याटप्याने अनुदानावर आलेले कर्मचारी यांना 1982 ची जुनी पेन्शन त्वरित मिळावी यासाठी ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले.