1 min read

मनीष सिसोदिया यांचेवर कारवाईचा निषेध म्हणून अमळनेरात आपचे निदर्शन

Loading

मनीष सिसोदिया यांचेवर कारवाईचा निषेध म्हणून अमळनेरात आपचे निदर्शन

अमळनेर प्रतिनिधी
आम आदमी पार्टीचे जेष्ठ नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचेवरील कारवाई निंदाजनक असून अमळनेर आम आदमी पार्टीने निदर्शने करून तहसीलदार यांना निवेदन दिले. नायब तहसीलदार अमोल पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
विश्रामगृहा समोर जोरदार घोषणा देऊन लोकशाहीची विटंबना चालली आहे या बाबत आक्रोश करण्यात आला. तेथून मोर्चाद्वारे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चात आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा गणेश पवार, धनंजय सोनार, स्वप्नील पाटील, नारायण पाटील, रामकृष्ण पाटील, महेंद्र साळुंके, अनिल पाटील, नामदेव पाटील, शिवाजी पाटील, सलिम लियाकत वायरमन, उमाकांत ठाकूर, अनिल बोरसे आदी उपस्थित होते.
पोलीस अंमलदार डॉ शरद पाटील व कैलास पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *