1 min read

मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली,विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची भेट

Loading


मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली

विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची भेट

मुंबई- राजापुर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण हत्येसह यापूर्वी गेल्या 25 ते 30 वर्षात 21 पत्रकार निर्दयपणे संपविण्यात आले. अनेक घटनांमध्ये आरोपींचा पत्ता नाही, शिक्षा झाल्याचे उदाहरण नाही. पत्रकारांवरील वाढते हल्ले व पत्रकारांचे अनेक प्रलंबित प्रश्न यासह विविध मागण्यांबाबत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने आज मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची भेट घेतली. शशिकांत वारीशे हत्याप्रकरण आणि पत्रकारांवरील हल्ले याबाबत चर्चा करून काही मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. यावेळी विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव दीपक कैतके आणि मुंबई अध्यक्ष राज आदाटे हे उपस्थित होते.


मो. 94227 95910

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *