1 min read

संभाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन सोहळा नुकताच जवखेडे येथे उतरती कट्टा येथे संपन्न

Loading

संभाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन सोहळा नुकताच जवखेडे येथे उतरती कट्टा येथे संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर येथिल भव्य संभाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन सोहळा नुकताच जवखेडे येथे उतरती कट्टा येथे संपन्न झाला.
‘छ.शंभू राजे यांचे झंजावती जीवन युवकांसाठी प्रेरणादायी आहे’ असे प्रतिपादन उदघाटक अशोक पाटील यांनी केले.
जवखेडे येथील उतरती कट्टा चौकात छ. संभाजी राजे मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित छ. संभाजीराजे स्मारकाचे आधार फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक आधार पाटील यांच्या हस्ते पूजन करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी गावकऱ्यांना कॅमेरे आणि सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ अर्चना पाटील या होत्या.तर यावेळी उपसरपंच प्रशांत पाटील ,मा. उपसरपंच चुडामन पाटील, मा. सरपंच शामकांत भैय्यासाहेब पाटील यांचेसह ग्रामपंचायत सदस्य, छत्रपती संभाजी राजे मित्र मंडळ , उतरती कट्टा चे युवा सदस्य तसेच आदर्श गाव जवखेडे चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *