1 min read

ए.वन क्लासेस लासुर येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न

Loading

ए वन क्लासेस लासुर येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न

लासुर येथील ए वन क्लासेस च्या वतीने २८ फेब्रुवारी रोजीच्या विज्ञान दिवसाचे औचित्यसाधून विद्यार्थ्यांना विज्ञानाची व तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी या हेतूने २६ फेब्रुवारी रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समिती चे माजी सदस्य अनिल पाटील यांच्या शुभ्रहस्ते संपन्न झाले. दीपप्रज्वलन क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश चे अध्यक्ष ए के गंभीर सर यांच्या शुभहस्ते तर प्रतिमा पूजन श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी केले. सदर प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांचे प्रकल्पाचे मूल्यांकन व निरीक्षणाचे काम लासुर येथील माजी सरपंच देविलाल बाविस्कर, सरस्वती क्लासेस चे संचालक विनोद महाजन, संचालिका शितल महाजन यांनी केले. विज्ञान प्रदर्शनात इ.८,९ वी च्या विदयार्थी व विद्यार्थीनी यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि विकास, ऊर्जा प्रकल्प, आरोग्याची काळजी व समाजातील अंधश्रद्धा निर्मुलन अश्या विविध भविष्यकालीन गरज लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करून त्याची संपूर्ण माहिती भेटी देणारे ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी यांना दिले. त्याप्रसंगी लासुर येथील माजी उपसरपंच वसंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाळू पाटील, बाळू महाजन, भिकन पाटील, पुरुषोत्तम सोनार, क्षत्रिय माळी समाज विकास मंडळाचे सह सचिव अरुण माळी, पालक नितीन महाजन, गोपीचंद पाटील, हरीश माळी, मुरलीधर उशीर आदी उपस्थित होते. सदर विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी ए वन क्लासेस चे संचालक राहुल पाटील सर उपसंचालक यश महाजन, विद्यार्थी अखिलेश माळी, गौरव पाटील,मयूर महाजन, आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ए वन क्लासेस चे उपसंचालक यश महाजन यांनी तर आभार सरस्वती क्लासेस चे संचालक विनोद महाजन यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *