1 min read

संत गाडगेबाबा जयंती अभिनव प्राथमिक सराव पाठशाळेत जनजागृती पर कार्यक्रम संपन्न..

Loading

संत गाडगेबाबा जयंती आमच्या अभिनव प्राथमिक सराव पाठशाळा येथे, स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, देई आरोग्याची गती’, स्वच्छ भारताचे अज्ञान,अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे, स्वच्छ भारताचे जनक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक ललित नेमाडे यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
स्वच्छतेचे महत्व काय? हे विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका स्नेहल ठाकूर यांनी पटवून दिले. सर्व शिक्षकांनी आवाराची व वर्गाची सफाई स्वतः व विद्यार्थ्यांकडून करून घेतली.
याप्रसंगी शाळेतील वैशाली राठोड,योगिता तळेले, प्रवीण वायकोळे, नीलिमा वारके, उमेश चौधरी,ज्योती इंगळे व अध्यापिका विद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापिका व इयत्ता पहिली ते सातवीचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *