लोणी काळभोर येथे थोर संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त वृक्षारोपण
![]()


लोणी काळभोर येथे थोर संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त वृक्षारोपण
लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहेत या अनुषंगानेच थोर संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोणी काळभोर चे युवा नेते मा.श्री. अमित भाऊ काळभोर, युवा उद्योजक मा.श्री सतिश शेठ काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त कदंब, कडुनिंब, चिंच, खैर, वड, उंबर अशा जंगली वृक्ष. वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.युवराज शेठ काळभोर यांच्या शुभ हस्ते कदंब वृक्ष लावण्यात आला.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज यांची २३ फेब्रुवारी रोजी जयंती असते. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन हेच गाडगेबाबांचे ध्येय होते. दुर्बल, अनाथ, अपंगांची ते नेहमी सेवा करायचे. संत गाडगेबाबा जिथे कुठे जायचे तेथील रस्ता स्वच्छ करण्याचे काम हाती घ्यायचे. गावातील अनेकांनी दिलेला पैसा त्यांनी समाजविकासाठी खर्च केला. या पैशांतून त्यांनी गावांमध्ये शाळा, धर्मशाळा, रुग्णालय आणि जनावरांसाठी निवारा बांधला. त्यांचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे झाला आहे. लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरले. गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली आहेत असे प्रतिपादन माजी उपसरपंच राजेंद्र आबा काळभोर यांनी केले.
या वेळी लोणी काळभोर ग्रा.सदस्य मा. श्री. राजेंद्र आबा काळभोर, ग्रा.सदस्य श्री.नागेश सर काळभोर, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.युवराज शेठ काळभोर, युवा नेते मा.श्री. सतिश शेठ काळभोर, मा.श्री. अमित भाऊ काळभोर, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष श्री.दत्तात्रय शेंडगे, युवा उद्योजक सचिन काळभोर, दत्तात्रय काळभोर तसेच ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग लोणी काळभोर, संयुक्त वनव्यवस्थापन समिती उपस्थित होते.

