1 min read

महाराष्ट्र राज्यांचे महामंत्री तथा नंदूरबार जिल्हाचे भाजपा अध्यक्ष श्री.विजयभाऊ चौधरी यांची 26 फेबुवारी 2023 रोजी धुळे जिल्हयाच्या दौरावर येत असल्याने त्यासंदर्भांत बैठकीचे नियोजन करण्यासाठी महापौर सौ.प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी व महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ धुळे जिल्हा यांनी केले बैठकीचे आयोजन

Loading

धुळे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यांचे महामंत्री तथा नंदूरबार जिल्हाचे भाजपा अध्यक्ष श्री.विजयभाऊ चौधरी यांची 26 फेबुवारी 2023 रोजी धुळे जिल्हयाच्या दौरावर येत असल्याने त्यासंदर्भांत बैठकीचे नियोजन करण्यासाठी महापौर सौ.प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी व महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघ धुळे जिल्हा यांनी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.
बैठकीच्या सुरूवातीला प्रदेश महासंघाचे सचिव श्री.जयवंत चौधरी यांनी सविस्तर संघाची माहिती देवून चर्चा करून निर्णय घेण्यात आले. तसेच सौ.प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी यांची धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदावर सुयोग्य निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ व शाल देवून प्रदेश तेली महासंघ, धुळे जिल्हाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच श्री.नरेश आप्पा चौधरी ,नगरसेवक, मनपा धुळे यांना निसर्ग समिती,धुळे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देवून गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचाही सत्कार प्रदेश महासंघाच्या वतीने करण्यात आला. तसेच कुमारी वर्षा विजय चौधरी हिने बी.ए. व एम.ए. या दोन्ही पदवीमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगांव दोन्ही पदवी व पदवीत्तर हिंदी या विषयात गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल तीचेही स्वागत व सत्कार सौ.प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी,महापौर, माजी महापौर सौ.जयश्रीताई अहिरराव, नगरसेवक श्री.नरेश आप्पा चौधरी, उद्योगपती श्री.दिलीप शंकर चौधरी, अक्कलकुवा तसेच श्री.शिवाजीराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी प्रदेश तेली महासंघा,धुळे जिल्हाचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी श्री. जयवंत चौधरी,सचिव, श्री.कैलास बोरसे, श्री.किशोर चौधरी, श्री.अतुल वाघ, श्री.गोविंद चौधरी, श्री.गणेश पवार, श्री.पी.टी.शिंदे सर, सौ.रूपाली महाले, सौ.कविता अहिरराव, सौ.प्रियंका चौधरी, सौ.आरती महाले, सौ.भारती चौधरी, सौ.अल्काताई चौधरी, सौ.मुक्ता चौधरी, सौ.विजया चौधरी यांच्यासह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *