ऐतिहासिक कोनगावात शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
![]()


ऐतिहासिक कोनगावात शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!
ठाणे (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यातील कला निकेतन मंडळ कोनगाव व ओबीसी एकता समता परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती महोत्सव २०२३ चे आयोजन कलानिकेतन व्यायामशाळा येथे रविवार दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले होते, कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन श्री.टी आर पाटील,श्री.वरुण पाटील,सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील,वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र पवार ,ग्रामविकास अधिकारी श्री.राजू आंधळे,शिवव्याख्याते ऍड.विवेक भोपी,पोलीस पाटील सौ.अश्विनी सौरभ पाटील आणि डॉ.प्रा.विनोद हनुमान पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कोनगांव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील,उपसरपंच श्री.गंगाराम दुंदा पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि सदस्या सौ.दिपाली सचिन कराळे,सौ.रेखा हनुमान म्हात्रे,सौ.कृतिका प्रमोद पाटील,सौ.मधू चंद्रकांत म्हात्रे,सौ रेखा निलेश मुकादम,सौ.सविता राजू किणी,सौ.लता (श्वेता ) अजय नाईक,प्रदोष पंडीत म्हात्रे,अनिकेत मच्छीन्द्र म्हात्रे,ग्रामविकास अधिकारी श्री.राजू आंधळे,
कोनगांव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री.राजेंद्र पवार,सामाजिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल श्री.रमेश बळीराम कराळे,कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल श्री.अशोक बळीराम म्हात्रे तर क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे आशियाई रौप्यपदक विजेते खेलो इंडिया कांस्यपदक विजेते पै.प्रणय राजू चौधरी,राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक विजेता पै.ओमकार संतोष कराळे,भारत श्री सुवर्णपदक विजेता कु.अविनाश चैनू पाटील,खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेत कांस्यपदक विजेता कु.क्षितिज बाजीराव ठोंबरे,राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत रौप्यपदक विजेते पै.हरेश चंद्रकांत कराळे,पै.किशोर रामचंद्र शिलोत्रे,मुंबई विद्यापीठ सुवर्ण पदक विजेते पै.मोहित बबन पाटील,पै.राज दिनकर पाटील,शालेय विभागीय कुस्ती स्पर्धेतील विजेते,पै.जय मंगेश म्हात्रे,पै.आर्यन साईनाथ कराळे,पै.मंथन पारिजात पाटील या सर्वांचा मान्यवरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य सन्मान करण्यात आला.
शिवव्याख्याते ऍड.विवेक भोपी (नितळस) पनवेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व क्षेत्रात केलेल्या कार्याची,पराक्रमाची,न्यायाची,निष्ठतेची,धार्मिकतेची,विविध पैलूंची महंती,राजमाता जिजाऊ,स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या मावळ्यांची महंती, कोकणातील आगरी,कोळी,मुस्लिम आणि बहुजन समाज यांनी केलेल्या कामगिरीची माहितीसांगून छत्रपती शिवाजी महाराज जगातील आदर्श राजे होते यांची माहिती सांगितली.
आभार प्रदर्शन करतांना डॉ.प्रा.विनोद हनुमान पाटील कोनकर यांनी शहापूर तालुक्यातील माहुली गडावर ऑगस्ट १६२९ मध्ये राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजे वास्तव्यास होते.शिवबा राजांवर गर्भसंस्कार यांच पवित्र भूमीत झाले.राजांचा जन्म आपल्या नशिबी नव्हते.या माहुली गडावर शिवबावर गर्भसंस्कार झाल्यामुळे गडाला पुरातत्व खात्याने विशेष दर्जा द्यावा आणि गडाचे संवर्धनासाठी निधी उपलब्ध करावे म्हणून माझे मित्र स्व.डॉ.शिवश्री दिलीप धानके यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन लोकनेते,केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पुरातत्व विभागाकडून निधी मंजूर झाले असून विशेष दर्जा देण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी भिवंडी व कल्याण प्रांत जिंकून २४ ऑक्टोबर १६५७ रोजी स्वराज्याचे पहिले आरमार कोन-कल्याण खाडीवर स्थापन केले.यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!! असे प्रस्ताविक भाषणात सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी मा.जि.प.सदस्या सौ.जयश्री चव्हाण,आर पी आयचे तालुकाध्यक्ष श्री.भरत जाधव,मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री भरत भोईर,मा.उपसरपंच दयानंद म्हात्रे,मिनानाथ म्हात्रे,गजानन जाधव,अरुण पाटील,मनोहर म्हात्रे,गुरुनाथ पाटील,हभप श्री.मधुकर कराळे,बबन पाटील,विष्णू पाटील,यशवंत पाटील,बाळाराम पाटील,सौ.अश्विनी मेस्त्री,विनोद म्हात्रे,नित्यानंद म्हात्रे,ऍड संदेश सरावते,श्री.शाम म्हात्रे सर,सचिन पाटील सर,प्रशांत चौधरी,कैलास भोईर,दिनेश मुकादम,शहाजन मगदूम तसेच गावातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
भाजपा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री.प्रमोद हनुमान पाटील आणि श्री कृष्ण मंडप डेकोरेटर्सचे प्रो.शरद नागो पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार श्री.अफसर खान यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रा.विनोद हनुमान पाटील,संघटक किरण रतन म्हात्रे,सहचिटणीस श्री.अनंता यशवंत म्हात्रे,कार्यकारी सदस्य श्री.प्रमोद हनुमान पाटील,प्रविण सदानंद पाटील,विलास सरस पाटील आणि पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.

