1 min read

सोमवारी जळगांवला आ. किशोर दराडेंचा शिक्षक दरबार, शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी व सर्व संबंधित अधिकारी उपस्थितीत राहणार

Loading

जिल्हयातील शिक्षकांच्या समस्यांसाठी निराकरणासाठी सोमवारी आमदार किशोर दराडेंचा शिक्षक दरबार शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी व सर्व संबंधित अधिकारी उपस्थितीत राहणार जळगाव जिल्हयातील शिक्षकांच्या,शाळांच्या व संस्थाचालकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांनी सोमवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सह. पतपेढी जळगाव येथे शिक्षक दरबार आयोजीत केलेला आहे. यावेळी नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक मा. बी.बी. चव्हाण साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, वेतन अधिक्षक प्राथमिक व माध्यमिक तसेच लेखाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील ज्या शिक्षकांच्या शाळांच्या व संस्था चालकांच्या समस्या असतील त्यांनी लेखी अर्जासह शिक्षक दरबाराच्यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार किशोरभाऊ दराडे, शिक्षक नेते संभाजी अप्पा पाटील, आर एच बाविस्कर , यु. यु.पाटील ,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के. पाटील , जी. आर. चौधरी शिक्षक संघाचे एच.जी.इंगळे ,आर. आर. पाटील , साधना लोखंडे, एस.एन. पाटील, ज्युनिअर कॉलेज संघटनेचे अध्यक्ष नंदन वळींकर , सुनिल सोनार , शैलेश राणे, सुनिल गरुड , सुनिल पाटील , कलाध्यापक संघाचे एन. ओ. चौधरी, अरुण सपकाळे, शिक्षकेतर संघटनेचे डिगंबर पाटील, संदीप डोलारे , आर.डी. बोरसे, विजय पवार, फेडरेशनचे सेक्रेटरी एस.डी.भिरुड , सी. सी. वाणी यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *