1 min read

उज्जैनकर फाउंडेशनच्या वर्धापन दिना निमित्त ३५ गुणवंत शिक्षकांना तापी- पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

Loading

उज्जैनकर फाउंडेशनच्या वर्धापन दिना निमित्त ३५ गुणवंत शिक्षकांना तापी- पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा २६ फेब्रुवारी रोजी १४ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे याप्रसंगी ३५ शिक्षकांना तापी- पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे याप्रसंगी फाउंडेशन ची वार्षिक सभा पहिल्या सत्रामध्ये घेतली जाईल व भोजनानंतर दुपारच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत व त्यांच्या शुभ हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे याप्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन चे केंद्रीय कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी सदस्य आजीव सभासद त्याचप्रमाणे जळगाव जिल्हा दक्षता समिती व बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सदस्य त्याचप्रमाणे राज्य कार्यकारणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सदस्य आणि विविध जिल्ह्यांचे सन्माननीय समन्वयक व संपर्कप्रमुख यांची उपस्थिती राहणार असल्याचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे. हे आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे आहेत.
एम. एफ. तराळ विद्यालय अंतुर्ली संजय सांगळकर आणि श्रीमती राजश्री जगन्नाथ पाटील,जे. ई.स्कूल मुक्ताईनगर राहुल सोनवणे, सौ.रंजना महाजन, आश्रम शाळा चारठाणा संदीप पाटील कन्या माध्यमिक विद्यालय मुक्ताईनगर आर. के. ढोले नवीन माध्यमिक विद्यालय हरताळे एस. आर. मोरेस्कर, घाटे विद्यालय उचंदा ए. एस. पाटील आणि सौ. संगीता वासुदेव निळे,स्व.अशोक फडके माध्यमिक विद्यालय कु-हा-काकोडा सर्जेराव सोनवणे ज्ञानपूर्णा विद्यालय इच्छापुर, निमखेडी गणेश मनोहर पवार
संत मुक्ताई माध्यमिक विद्यालय मुक्ताईनगर जे. ए. पाटील एस. बी. चौधरी विद्यालय चांगदेव सौ. स्वाती उदय चौधरी, पूर्णामाई माध्यमिक विद्यालय घोडसगाव के. एन. पाटील, कर्की विद्यालयातील संजय सेनु वाडीले, जामनेर प्रा. सुनील रामकृष्ण बावस्कर जळगाव मुकेश तुकाराम बोरोले, बोदवड सौ.सुरेखा सुभाष रूले जळगाव सौ. शरीपा सायबु तडवी जि. प. प्राथ. शाळा, रोझोदा श्रीमती छाया सुदाम महाजन बहिणाबाई प्राथ. शाळा जळगाव पद्माकर पंढरीनाथ चौधरी, संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय मुक्ताईनगर येथील जे. ए. पाटील, उर्दू हायस्कूल मुक्ताईनगर शेख शकील शेख अजीज, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल मुक्ताईनगर श्रीमती लीना विजय रडे, कै. गणपतराव खडसे आश्रम शाळा कोथळीचे राहुल मधुकर चौधरी, आश्रम शाळा बोरगाव ता. धरणगावचे मनोज हिम्मतराव ठाकरे, श्रीनाथ हायस्कूल वरणगावच्या सौ. ललिता निळकंठ भंगाळे, जि. प. उच्च प्राथमिक शाळा बोरखेडा नवे येथील प्रवीण मनोहर पाटील, हलकर्णी भाग हायस्कूल हलकर्णी जि.कोल्हापूर येथील कला शिक्षक जयवंत कृष्णा दरेकर, पाडळसा तालुका यावल येथील केंद्रप्रमुख श्रीमती लतिका लीलाधर पाटील, संजय घोडावत इंटर स्कूल अतिग्रे जि. कोल्हापूर येथील संदीप बाळासो व्हनाळे, मंदाबाई महादू नारखेडे विद्यालय रुईखेडे ता. मुक्ताईनगर येथील शशिकांत भागवत सोनवणे, नवीन माध्यमिक विद्यालय, निमखेडी हर्षल प्रभाकर झोपे, पी.के. गुळवे मुलींची माध्यमिक विद्यालय जळगाव येथील वसंत पुंजो सरोदे, जि. प. प्राथमीक शाळा वंजारी ता.धरणगाव येथील वर्षा प्रदीप साळुंखे , दिपाली सोपान गवात्रे डॉ.जगदीशदादा पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मुक्ताईनगरआदी गुणवंत शिक्षकांना शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी तापी-पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे असे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *