1 min read

भारतीय संस्कृती जपण्यासाठी सम्राट अशोक विद्यालयाचा आदर्श इतर शाळांनी घ्यावा- गुलाबराव पाटील
मातृपित्रू पूजन करून विद्यार्थ्यांनी आपल्या घरी साजरा केला व्हॅलेंटाईन डे.

Loading

भारतीय संस्कृती जपण्यासाठी सम्राट अशोक विद्यालयाचा आदर्श इतर शाळांनी घ्यावा- गुलाबराव पाटील
मातृपित्रू पूजन करून विद्यार्थ्यांनी आपल्या घरी साजरा केला व्हॅलेंटाईन डे.
कल्याण.( मनिलाल शिंपी)- १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. भारतातही हा दिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे प्रेम आणि काळजी नसेल तर कोणत्याही नात्याला काही अर्थ नाही .या उद्देशाने पालकांप्रती आदरभाव रहावा म्हणून पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय कल्याण येथील शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या काही वर्षापासून १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ पितृ देव भव म्हणून साजरा केला जातो कोविड काळात हा दिवस विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी साजरा केला.या वर्षी देखील १४ फेब्रुवारीला रात्री आठ वाजता एकाच वेळी प्राथमिक. माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी पालकांचे पाय धुवून पूजा अर्चा करून ओवाळले तसेच गोड पदार्थ खाऊ घातले.अशा प्रकारे एक आगळा वेगळा उपक्रम शाळा राबवत असते. इतर शाळांनी सुद्धा सम्राट अशोक विद्यालयाचा आदर्श घेऊन १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणजे मातृ पितृ देव भव. कार्यक्रम केला तर भारतीय संस्कृती जपली जाईल असे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले.या उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *