1 min read

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग उत्साहात संपन्न

Loading

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग उत्साहात संपन्न

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या प्रसंगी त्यांनी पुढील विविध विषय मांडलेत त्यात सर्वप्रथम 26 फेब्रुवारी 2023 वार रविवारला फाउंडेशनचा 14 वा वर्धापन दिन असल्याने त्याविषयी सर्वांमध्ये चर्चा करण्यात आली या दिवशी 35 शिक्षकांना तापी-पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार तसेच वर्धापन दिनाच्या दिवशी गाव गाव फिरते वाचनालयाच्या ओमणी गाडीचे उद्घाटन करणे तसेच दुसरे राज्यस्तरीय शिव मराठी साहित्य संमेलन 3 मे 2023 रोजी मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी नियोजित असून त्या संदर्भात सर्वांनी आपले विचार या झूम मीटिंग द्वारे मांडलेत याप्रसंगी राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. सतीश तराळ, अमरावती, फाउंडेशनचे दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन पन्हाळा जिल्हा कोल्हापूरचे अध्यक्ष जेष्ठ कादंबरीकार प्रा. दि.बा. पाटील राज्य सचिव प्रा. डॉ. सुभाष बागल, औरंगाबाद राज्य सहसचिव डॉ. मा ग. गुरव, कोल्हापूर , राज्य महिला समन्वयक सौ. लताताई गुठे मुंबई, राज्य समन्वयक प्रा. डॉ.राजकुमार कांकरिया, पुणे जळगाव जिल्हा दक्षता समितीचे उपाध्यक्ष श्री किशोर पाटील सर, जळगाव जिल्हा दक्षता समितीचे सचिव श्री गणेश कोळी सर, सल्लागार श्री मधुकर पोतदार, बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष शाहीर मनोहर पवार , समन्वयक श्री पांडुरंग दैवज्ञ साहेब कार्याध्यक्ष श्री गजानन कऱ्हे, बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे सचिव श्री शंकरराव अनासुने सर संघटक कवी रामदास कोरडे , डॉ. निवृत्तीभाऊ जाधव , कोषाध्यक्ष श्री मनोहर काळे, पुणे जिल्हा समन्वयक श्री तान्हाजी बो-हाडे सर आणि महिला समन्वय कोमल नाईकडे मॅडम आदी पदाधिकारी या झूम मीटिंगमध्ये उपस्थित होते. प्रसंगी सर्वांनीच वरील विषयावर आपले विचार मांडून अनुमोदन दिले याप्रसंगी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या पुढील उपक्रमाविषयी आनंद व्यक्त करून शुभेच्छा दिल्यात शेवटी प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *