1 min read

गुंदवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी चंद्रभागा म्हात्रे यांची बिनविरोध निवड!

Loading

गुंदवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी चंद्रभागा म्हात्रे यांची बिनविरोध निवड!

ठाणे: दि.१६(मनिलाल शिंपी)
भिवंडी तालुक्यातील सर्व गुण संपन्न असलेल्या गुंदवली ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती.उमाबाई आत्माराम म्हात्रे यांना दिलेला कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी सह खुशीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी रविवार दिनांक १२/०२/२०२३ रोजी अध्यासी अधिकारी तथा भिवंडी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री . इंद्रजीत काळे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेवक श्री. राकेश वसंत जोशी व उपसरपंच श्री. प्रमोद अनंत म्हात्रे यांच्या खास उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. सरपंच पदासाठी सौ. चंद्रभागा वचन म्हात्रे यांचा एकमेव नाम निर्देश पत्र आल्यामुळे अध्यासी अधिकारी तथा पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी श्री.इंद्रजीत काळे यांनी सौ.चंद्रभागा वचन म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले, त्यांच्या निवडीची घोषणा होताच त्यांच्या सर्व समर्थकांनी, नातेवाईक ,आप्तेष्ट, मित्रमंडळी व कुटुंबीयांनी फटाक्यांच्या आतश बाजीत ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले,
यावेळी त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी गुंदवली गावातील एक प्रतिष्ठित आधारस्तंभ व बाळासाहेबांची शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ (बाळ्या मामा), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.डी.के.म्हात्रे ,भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.विकास अनंत भोईर, ज्येष्ठ समाजसेवक श्री कमलाकर गोपीनाथ म्हात्रे, व गावातील सर्व आजी-माजी सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचप्रमाणे सन्माननीय सदस्य मावळत्या सरपंच श्रीमती.उमाबाई आत्माराम म्हात्रे , सौ.रोशनी राजेश पाटील, श्री.प्रकाश श्रीपत पाटील,श्री.मनेष वसंत म्हात्रे, सदस्या सौ. बेबीबाई नारायण पाटील ,सौ.जया नितीन म्हात्रे या सर्वांनी उपस्थित राहून निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्यामुळे सर्वांचे आभार नवनिर्वाचित सरपंच सौ. चंद्रभागा वचन म्हात्रे यांनी मानले, यानंतर गावात जलजीवन योजनेअंतर्गत आलेल्या जलकुंभाचे भूमिपूजन श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले ,ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी
सरपंच ,उपसरपंच ग्रामसेवक, सन्माननीय सदस्य व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *