1 min read

महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र तामसवाडी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन

Loading

पारोळा-आज दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र तामसवाडी येथे महाआरोग्य शिबिर चे आयोजन करण्यात आले.
त्याप्रसंगी तामसवाडी गावचे सरपंच मिना मोरे यांनी अध्यक्षस्थान भूषविले डॉ. चेतन बडगुजर वैद्यकीय अधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले
कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच हिरामण राजाराम पाटील , अनिल बाबूलाल पाटील , शिवाजी पाटील श्री मोतीराम पाटील श्री रामदास पुंजू पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचप्रमाणे डॉ. चेतन पाटील वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन बडगुजर वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता पाटील, डॉ. संजीवनी पाटील, शुभांगी तायडे, पूजा सावंत, कैलास घुगे गजानन कांबळे समुदाय आरोग्य अधिकारी, मंदाकिनी वडवी आरोग्य सहायिका, प्रभाकर साळुंखे आरोग्य सहाय्यक, मनोहर चौधरी आरोग्य सहाय्यक , आधार भोई, नितीन साळी, राकेश शिंपी, वाय आर पाटील, परेश कासार, संदीप सपकाळे आरोग्य सेवक, मनीषा पाटील प्रतिभा मोरे आरोग्य सेविका सुवर्णा देसले संगीता पाटील गटप्रवर्तक तसेच सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होते तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते
सदर महाआरोग्य शिबिरामध्ये 63 गरोदर माता, 17 स्तनदा माता, 19 लहान बालके व 31 किशोरवयीन मुली 63 इतर आजारी रुग्ण यांनी महा आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
बालरोगतज्ञ डॉ. निलजा बह्राडे MS (प्रसुतीतज्ञ स्त्रीरोग तज्ञ )डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज टीम यांनी कामकाज पाहिले.
साळुंके आरोग्य सहाय्यक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर राकेश शिंपी आरोग्य सेवक यांनी उपस्थिताचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा सेविका व मदतनीस यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *