आदर्श माध्यमिक विद्यालयात विज्ञान मेळावा संपन्न…
![]()
आदर्श माध्यमिक विद्यालयात विज्ञान मेळावा संपन्न…
विद्यार्थांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला पाहिजे — भारती पाटील


कोणत्याही गोष्टीचा तार्किक विचार करणं म्हणजे विज्ञान — संचालक अश्विन पाटील
धरणगाव — आदर्श माध्यमिक विद्यालय धरणगाव येथे आयोजित विज्ञान, कला आणि कार्यानुभवाच्या प्रदर्शन संपन्न झाले या प्रदर्शनाला विविध शाळांनी सदिच्छा भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.
या विद्यालयात विद्यार्थ्यांनी कला, कार्यानुभव आणि विज्ञान विषयांवर आधारित विविध उपकरणे तयार केलीत व त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये ५ ते ८ च्या प्राथमिक व ९ – १० च्या उच्च प्राथमिक गटातील विद्यार्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आणि जवळजवळ ७४ उपकरणे तयार केली उपकरणांनी हे प्रदर्शन सजले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आदर्श माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयाचे संचालक अश्विन पाटील यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे हे होते तर बाहय परीक्षक म्हणून इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचा जेष्ठ विज्ञान शिक्षका भारती पाटील उपस्थित होत्या यावेळी मान्यवरांचा शाल आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. परीक्षिका पाटील यांनी वस्तुनिष्ठपणे निरीक्षण नोंदवून अतिशय पारदर्शकपणे मूल्यांकन केले आणि त्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल बंद लिफाफ्यात मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द केला. या प्रदर्शनाला प्रा व्ही जी पाटील प्राथमिक विद्यामंदिर,इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श प्राथमिक शाळा, आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय, या शाळांच्या विद्यार्थांनी व शिक्षकांनी भेटी दिल्यात. विद्यार्थी व शिक्षकवृंदानी उपकरणांची भरभरून स्तुती केली. नाविन्यपूर्ण, टाकाऊ पासून टिकाऊ, वैविध्यपूर्ण, समाजोपयोगी, वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्व बाबींचा सर्वंकषपणे समावेश असलेल्या उपकरणांनी सज्ज अशा प्रदर्शनात ज्या विद्यार्थांनी सहभाग नोंदवला त्यांना उपक्रमशील विज्ञान शिक्षिक मुकेश तोरवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रदर्शनाला इंदिरा गांधी विद्यालयाचे पर्यवेक्षक ए एस पाटील, एन बी पाटील, डी एन पाटील,डी एम पाटील,आर एन पाटील माजी पर्यवेक्षक आर एस पडोळ यांचे अनमोल सहकार्य लाभले.
हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपशिक्षिका वैशाली पाटील, उपशिक्षक प्रवीण पाटील, तुषार नाईक, बाबाजी मासुळ,फिलिप गावीत, पी ए पाटील, कांतीलाल पाटील, विजय पाटील, अमोल चौधरी यांनी परिश्रम घेतले
या सुंदर अश्या प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सी के पाटील, उपाध्यक्ष किरण पाटील,सचिव सौ सुरेखा पाटील,संचालक मच्छिंद्र पाटील यांनी केले आहे
उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी केले.

