1 min read

संस्कृत शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव मधील १८ विद्यार्थ्यांची निवड.

Loading

संस्कृत शिष्यवृत्तीसाठी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव मधील १८ विद्यार्थ्यांची निवड.

जळगाव: केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय,नवी दिल्लीतर्फे इ.११वी व १२वीमध्ये संस्कृत विषय घेऊन विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना संस्कृत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. शहरातील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयामधील दरवर्षी या शिष्यवृत्तीसाठी अनेक विद्यार्थी पात्र ठरतात. हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवत या वर्षी ही (२०२१-२२) इ.११वी व १२वी मध्ये संस्कृत विषय घेऊन शिक्षण घेणारे १८ विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय नवी दिल्ली यांच्याकडून महाविद्यालयाला त्याबाबत नुकतेच पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे.
या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती.

चौधरी माहेश्वरी नरेंद्र, बडगुजर कृत्तिका ज्ञानेश्वर, पाटील श्रद्धा, शेलार श्रद्धा, सपकाळे दिव्या किशोर, झंवर अंजली दिपक , कु. किमया, शिरसाळे हितेश जगदीश, बंगाली वैदेही प्रमोद, सोनवणे ऋतुजा अनिल, साळुंके दिव्या किशोर, विशाखा पाटील, भालेराव श्रावणी प्रशांत, दर्शना वर्मा, जागृती महाजन व वैदेही ताडे हे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत मा.श्री.नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.सं.ना. भारंबे, उपप्राचार्य प्रा. श्रीमती के.जी.सपकाळे , पर्यवेक्षक प्रा.श्री आर.बी. ठाकरे,समन्वयक प्रा.सौ. स्वाती बऱ्हाटे, प्रा.श्री. उमेश पाटील, प्रा.श्री. प्रसाद देसाई विषय शिक्षक प्रा.श्री. अर्जुनशास्त्री मेटे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *