1 min read

लाड सुवर्णकार समाज अमळनेर तर्फे संत नरहरि महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.

Loading

लाड सुवर्णकार समाज अमळनेर तर्फे संत नरहरि महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर,ता.अमळनेर (दि.८/२/२३) येथील लाड सुवर्णकार समाज तर्फे संत नरहरि महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी रमणलाल नागोरे तर अतिथी म्हणून प्रभाकर पवार, दिलीप मुंडके, गोविंद चित्ते, सुरेश विंचुरकर होते.सुरवातीला अध्यक्ष व अतिथींच्या हस्ते नरहरि महाराजांच्या मुर्ति ची पुजा करून माल्यार्पण करण्यात आले.सेवापूर्ति निमित्त संजय मुंडके व राकेश पांडव यांचा गौरव करण्यात आला. प्राध्यापक भूषण दहिवाळ, देवेंद्र विंचुरकर,मंजित नागोरी यांन सह समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पेन देऊन अभिनंदन केले. सौ.योगिता शिरीष डहाळे यांची लाड सुवर्णकार महिला मंडळ अध्यक्षा म्हणून सर्वानुमते निवड करून अभिनंदन करण्यात आले.नितीन विंचुरक, अनिल कुलथे, हेमंत पवार यांनी कार्यक्रमाला आर्थिक मदत दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले.
या प्रसंगी समाजातील युवा मंडळाचे तरूण कुणाल दहिवाळ, कुलदीप मुंडके, विलास कुलथे, तुषार कुलथे, कुलदीप खोरे पंकज पवार, हिमांशू कुलथे, राहुल सोनार यांचा ही गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रास्ताविक व आभार दिपक पवार यांनी मानले.योगेश पांडव, निलेश नागोरे, महेंद्र कुलथे, अविनाश पांडव योगेश खोरे,चिंतामन चित्ते, गिरीश सराफ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *