1 min read

माता रमाई डॉ.बाबासाहेबांच्या जीवन संघर्षाची संजीवनी होती : शशिकांत हिंगोणेकर

Loading

माता रमाई डॉ.बाबासाहेबांच्या जीवन संघर्षाची संजीवनी होती : शशिकांत हिंगोणेकर

” माता रमाई डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवन संघर्षाची संजीवनी होती ” असे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक कविवर्य शशिकांत हिंगोणकर यांनी केले.भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव तर्फे माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना हिंगोणेकर बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव स्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड असून प्रमुख अतिथी राष्ट्रीय कीर्तनकार मनोहर खोंडे,निवृत्त केंद्रप्रमुख तथा कवी अरुण वांद्रे ,ग.स.सोसायटी जळगाव संचालक महेश पाटील,डॉ. कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक प्रमुख विजय लुल्हे ,अशोक महाले,राजकुमार गवळी उपस्थित होते.मंगळवार दि.७ फेबुवारी २०२३ रोजी जळगाव जनता बँक,नवी पेठ शाखेतील सभागृह जळगाव येथे माता रमाई यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
किर्तनकार मनोहर खोंडे यांनी माता रमाईंनी बाबासाहेबांच्या खडतर आयुष्यात मूल्यांची फुलवलेली बाग सोदाहरण स्पष्ट केली.अध्यक्षीय भाषणात निळकंठ गायकवाड म्हणाले की,” आर्थिक विवंचनेत माता रमाईंनी भावनांना विवेक व त्यागाचा बांध घालून बाबासाहेबांना सानंद पाठबळ दिल्यानेच बाबासाहेबांच्या सामाजिक व राष्ट्रीय कार्याचा उत्तुंग आलेख देशातच नव्हे तर निरंतर जागतिक पातळीवर उंचावला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार गवळी व आभार प्रदर्शन भिशीचे सक्रिय सभासद सुदाम बडगुजर यांनी केले.
कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात विवेकानंद प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड यांनी चाईल्ड हेल्पलाइन,महिला बचत गट,शैक्षणिक उपक्रम तसेच प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील यांनी बँकिंग नेटवर्क, आरोग्य विभाग प्रमुख भानुदास येवलेकर यांनी आरोग्य विषयक सेवा आणि प्रशासकीय अधिकारी सागर येवले यांनी प्रतिष्ठानचे भावी संकल्प,दिशा व व्याप्ती उपस्थितांना यशोगाथेसह विनम्रभावे सांगितली.पुस्तक भिशी प्रमुख विजय लुल्हे यांनी प्रतिष्ठानच्या समाज व राष्ट्रीय उत्थानाच्या सेवाभावी एकूण २३ प्रकल्पांची माहिती दिल्याबद्दल प्रतिष्ठानच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांप्रती ऋणनिर्देश व्यक्त केले.याप्रसंगी सविता वांद्रे ,संगीता गवळी,कोमल पाटील,संगीता पाटील,सुनीता महाले,रविंद्र बोरनारे ,भुषण नारखेडे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *