शिक्षक वक्ता ,नेता व अभिनेता असावा : प्रा.वा.ना.आंधळे
[ पिंप्री येथे अशोक चौधरी लिखित ‘ माझा जीवन प्रवास ‘ आत्मकथनपर पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न ]
![]()

शिक्षक वक्ता ,नेता व अभिनेता असावा : प्रा.वा.ना.आंधळे
[ पिंप्री येथे अशोक चौधरी लिखित ‘ माझा जीवन प्रवास ‘ आत्मकथनपर पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न ]
” शिक्षकाचा जन्म लाभणे हे भाग्य असून शिक्षकांत कवित्व असणे अहोभाग्य मानतो.हे कवित्व समाजाच्या उपयोगी येणे यास मी परमभाग्य म्हणतो या तिन्ही भाग्यांचे धनी अनोरे विद्यालयाचे निवृत्त उपशिक्षक तथा कवी साहित्यिक व अहिराणी चित्रपटाचे कलाकार,लेखक,दिग्दर्शक अशोक चौधरी निर्विवाद आहेत असे गौरवपर प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रा.वा.ना.आंधळे यांनी पुस्तक प्रकाशन करतांना मार्गदर्शनात सोहळ्यात केले.पिंप्री खुर्द ता.धरणगाव येथे ५ फेब्रुवारी २०२३ रोजी अशोक चौधरी यांचे ‘ माझा जीवन प्रवास ‘ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्ष अखील भारतीय समरसता मंचचे कार्यकारिणी सदस्य प्रा.रमेश महाजन होते.पुस्तक प्रकाशन चौधरी सरांचे गुरुवर्य प्राध्यापक वा.ना.आंधळे यांच्या हस्ते झाले. विचार मंचावर प्रा.डॉ.केसुर,अनोरे विद्यालयाचे चेअरमन रमेश महाजन,प्रा.आर.बी.ठाकरे,अनोरे विद्यालयाचे मुख्या. एम.एच.चौधरी,सुवर्णपदक प्राप्त मल्ल तथा चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे,भाजपा नेते पी.सी.पाटील,नगरसेवक कैलास माळी,जि.प.सदस्य गोपाल चौधरी,सेवानिवृत्त मुख्या.पी.यु.पाटील,कवी विश्राम बिरारी ( धुळे ),मंगल पाटील मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा.दीपक चौधरी यांनी केले.मान्यवर व प्रमुख अतिथींचे बुके व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
प्रकाशना प्रसंगी भानुदास विसावे,प्रा.बी. एन.केसुर व आर.बी.ठाकरे ( एम.जे.कॉलेज,जळगाव ),एम.एच. चौधरी,गोपाल चौधरी,पी.यू.पाटील,विश्राम बिरारी,आदींनी मनोगतातून अशोक चौधरी यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळवलेल्या प्रेरणादायी यशाचे कौतुक केले. लेखक अशोक चौधरी यांनीही आपला संघर्षमय जीवनाची मूल्यात्मक जीवनप्रवास संक्षेपाने मांडून उपस्थितांना अंतर्मूख केले.अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रा.रमेश महाजन म्हणाले ,”अशोक चौधरी समाजासाठी अष्टपैलू आदर्श व्यक्तीमत्व आहे.मोलमजुरी करणारा मजुर ज्ञानोपासक होऊन विद्याथीप्रिय आदर्श शिक्षक आणि प्रख्यात गीतकार अन् साहित्यिक बनू शकतो हे आत्मकथेतून सिद्ध होते.”
प्रकाशन समारंभास पंचक्रोशीतील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील आप्तेष्ट,माजी विद्यार्थी व महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर रोकडे व बी.आर.महाजन आणि आभार प्रदर्शन ललित चौधरी यांनी केले.

