मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त “कवी आपल्या भेटीला”
![]()



मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त “कवी आपल्या भेटीला”
पारोळा : किसान महाविद्यालय,पारोळा येथील मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त “कवी आपल्या भेटीला” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
एरंडोल येथील प्रसिद्ध बालकवी विलास मोरे यांनी मराठी कवितेत जीवन जगण्याचे बळ असून कविता लढायला शिकविते असे मत व्यक्त केले. अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील होते. यावेळी कवी विलास मोरे यांनी मराठी भाषेचा जागर, मातेचे प्रेम,सामाजिक जाणिव,देशभक्ती, अशा विविध विषयावर कविता सादर करत मराठी भाषेची जनजागृती करून सर्वांची मने जिंकली.प्राचार्य डॉ.वाय. व्ही. पाटील यांनी सामाजिक माध्यमांचा वापर कमी करून विद्यार्थ्यानी वाचनावर आणि आपली मातृभाषा मराठी बोलण्यावर अधिक भर द्यावा.असे संबोधित केले. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. गुणवंत सोनवणे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षचे समन्वयक डॉ. प्रकाश पाटील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. एम. बी. बाविस्कर प्रा. अविनाश अहिरे विचार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्यात. डॉ. एम. बी. बाविस्कर ग्रंथपाल डॉ. चंद्रकात सातपुते व विद्यार्थ्यानी कविता सादर केल्या. प्रसंगी कला विभागातील डॉ. सविता चौधरी, प्रा. प्रमोद चौधरी, प्रा.जे.पी.जोगी, प्रा.गोविंद वसावे, प्रा. शशिकांत पाटील, डॉ.आर. एस. माळी, प्रा. अरविंद भंडारे विज्ञान विभागातील डॉ. बी. एस. भदाणे, डॉ.एन.बी.शिरसाठ डॉ. पी. पी.पाटील डॉ.दीपक साळुंखे, डॉ. प्रफुल्ल ठाकरे, प्रा. वळवी. वाणिज्य विभागातील प्रा. प्रशांत इंगोले. डॉ.हितेश पवार, डॉ. किरण पाटील डॉ हर्ष सरदार आदी प्राध्यापक वर्ग आणि सर्व विभागातील विद्यार्थी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेत माय मराठी भाषेचा जागर केला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. भोगेनाना श्री. गुलाब भोई श्री. निलेश पाटील यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. माणिक बागले परिचय डॉ. प्रदीप औजेकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन व आभार कविता माळी यांनी मांडले.

