1 min read

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात व राज्यातील शैक्षणिक संस्थामध्ये आदरांजली.

Loading

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त

विधानभवनात व राज्यातील शैक्षणिक संस्था मध्ये आदरांजली.

मुंबई, दि. 30: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधान भवन येथे महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी महाराष्ट्र विधिमंडळाचे उप सचिव राजेश तारवी, अध्यक्षांचे सचिव महेंद्र काज यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच, याप्रसंगी हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली सकाळी अकरा वाजता राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थेतही महात्मा गांधीचे स्मरण करून आदरांजली वाहण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *