अमळनेरला पदवीधर आमदार निवडणूक शांततेत सुरु,अँड शुंभागी पाटील व सत्यजित तांबे यांना मतदारांची प्रथम पसंती…
![]()




अमळनेरला पदवीधर आमदार निवडणूक शांततेत सुरु…..
अँड शुंभागी पाटील व सत्यजित तांबे यांना मतदारांची प्रथम पसंती…
अमळनेर प्रतिनिधी-पदवीधर शिक्षक आमदारकीची निवडणूक 2023 महाविकास आघाडीच्या उमेदवार शुंभागी पाटील व अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यात खरी चुरस आहे.अमळनेरला निवडणूसाठी तहसील कार्यालय समोर महाविकास आघाडीचे शुंभागी पाटील समर्थन साठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी,तालुकाध्यक्ष सचीन पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे डॉ कुणाल पवार ,मकरंद निळे ,राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे हर्षल पाटील, समाधान पवार ,भिकन पाटील, किशोर बागुल व उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक, काग्रेंसचे कार्यकर्ते
यांनी बुथ लावलेले आहे. तर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यासाठी बुथ जयवंतराव आबा पाटील, गोकुळ बोरसे,गुलाबराव बोरसे, संदीप घोरपडे, मनोज पाटील, मयूर पाटील ,महेंद्र पाटील, देवेंद्र महाजन, हेमकांत पाटील
त्यांनी बुथ लावलेले आहे.
नाशिक पदवीधर निवडणूक या वर्षाला अत्यंत अटीतटीची होणार आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार व शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शुभांगीताई पाटील यांचाही प्रचार पाचही जिल्ह्यात जोरावर होता व डाँ सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केलेली आहे त्यांनाही व तांबे परिवाराला मानणारा मोठा वर्ग आहे.. आज अमळनेर शहरात मतदान अत्यंत शांततापूर्ण वातावरणात पार पडत आहे. यासाठी अमळनेर शहराचे पोलीस निरीक्षक शिंदे साहेब व त्यांचे सहकारी यांनी चोक बंदोबस्त ठेवला आहे यावेळी निवडणूक दरम्यान मतदान केंद्राला महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील, भाजपच्या माजी आमदार स्मिताताई वाघ,जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री पाटील, एडवोकेट ललिता पाटील, आम आदमी पार्टीचे उमेदवार ईश्वर पाटील, पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी व अधिकारी वर्गाने भेटी दिल्या .निवडणूक दरम्यान तहसील कार्यालय समोर खूपच मोठी गर्दी होती, रस्त्यात मोटरसायकल असल्यामुळे ट्राफिक जाम झाला होता अखेर पोलिसांनी रस्ता मोकळा केला.
यावेळी निवडणुकीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मतदानासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह आहे.उमेदवार शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे या दोघाच्या भूतवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होती दोघांमध्ये अटीतटीचा सामना होणार आहे. एखादा उमेदवार थोड्याफार मताने पडेल किंवा जिंकेल असे सर्वसामान्य लोकांमध्ये बोलले जात आहे.. यावर्षी पहिल्यांदाच महाविकास आघाडी सरकारने महिला उमेदवाराला प्राधान्य दिले आहे. डॉ तांबे परिवाराला पुन्हा मतदार संधी देतील का? शिक्षक संघटनेच्या शुभांगी ताईला संधी देतील .. सध्या लोकांमध्ये चर्चा सुरू आहे…
जळगाव माध्यमिक शिक्षक पतपेढीची निवडणूक 5 फेब्रुवारी ला असल्यामुळे सहकार गटाचे उमेदवार मुख्याध्यापक एम. ए .पाटील व अपक्ष उमेदवार मुख्याध्यापक तुषार बोरसे यांना प्रचाराची चांगली संधी भेटली आहे व दोन्ही उमेदवार व त्यांचे प्रचारक सर्व शिक्षकांना भेटून आपली उमेदवारी कशी योग्य हे सांगत होते…

