1 min read

खडक माळेगाव हरीबाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहाच्या संपन्न

Loading

निफाड खडक माळेगाव हरीबाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहाच्या संपन्न निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे सालाबाद प्रमाणे तीन दिवस भरणारी हरिबाबा यात्रा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली तीन दिवसात या यात्रेला हजारो भाविकांनी नागरिकांनी हजेरी लावली शुक्रवारी या यात्रोत्सवाचा समारोप झाला
सालाबाद प्रमाणे माघ शुद्ध चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीच्या दिवशी बुधवारी हरीबाबा यात्रोत्सवाला प्रारंभ झाला तीन दिवस भरणारी ही यात्रा पंचक्रोशीतील नागरिकांना, भाविकांना पर्वणीच असते.यावर्षी रथोत्सवाचे पूजन माजी आमदार अनिल कदम, नानासाहेब पाटील,माजी प.स.सभापती सोमनाथ पानगव्हाणे, प.स.सदस्य शिवा सुरासे, लासलगावचे सरपंच देवदत्त होळकर, यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी विजय सांगळे ,माजी सरपंच जेष्ठ नागरिक देवराम शिंदे, कारभारी रायते विद्यमान सरपंच जगदीश पवार, उपसरपंच विकास रायते, यात्रा कमिटी अध्यक्ष कैलास रायते, उपाध्यक्ष संजय शिंदे, जयवंत राजोळे, कोषाध्यक्ष अशोक रायते, सुरेश रायते, दत्ता रायते, अॅड. विजय रायते,बाबाजी रायते, ज्ञानेश्वर नेहरे, रवींद शिंदे, पोपट गणपत रायते, शांताराम रायते,शिवराम रायते, रावसाहेब रायते,सुनील शिंदे ,किरण शिंदे, वाल्मिक रायते, भागवत रायते,विठ्ठल कान्हे, पोलीस पाटील वैशाली बाजारे ,ज्ञानेश्वर शिंदे, अनिले शिंदे योगेश रायते, साहेबराव कान्हे ग्रामस्थ, युवक मंडळे, यात्रा कमिटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील असंख्य भाविक उपस्थित होते मिरवणुकीत सजवलेल्या रथात हरिबाबा यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती ही मिरवणूक खडक माळेगाव गावातून काढण्यात आली रथाच्या अग्रभागी नामवंत तीन ब्रास बँड होते
यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी लासलगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला हो
ता 3 दिवसात हजारो भाविकांनी या यात्रेत हजेरी लावून हरीबाबा मंदिरात दर्शन घेतले या यात्रेत विविध प्रकारची दुकाने लावण्यात आली असून नागरिकांनी दुकानात खरेदीसाठी गर्दी केली होती हॉटेलमध्येही नागरिकांनी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *