1 min read

प्रजासत्ताक दिनी मुसई खु शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाले स्पोर्ट्स ड्रेस

Loading

प्रजासत्ताक दिनी मुसई खु शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाले स्पोर्ट्स ड्रेस

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खुर्द तालुका धरणगाव जिल्हा जळगाव येथे भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे खास वैशिष्ट म्हणजे शाळेतील सर्व म्हणजे ७० विद्यार्थ्यांना या शुभदिनी दात्यांकडून स्पोर्टस ड्रेस मिळाले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया व शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी मुसई खु ही शाळा गुणवत्ता वाढीसाठी दत्तक घेतली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षणतज्ञ प्रवीण गगडाणी जळगाव यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस दिले.याच ड्रेसमध्ये विद्यार्थ्यांनी सांघिक कवायतीचे विविध प्रकार सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.पहिल्यांदाच असा ड्रेस मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला.आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांचे पालकही आनंदी झालेत.मान्यवरांच्या या विशेष मदतीमुळे शाळेतील मुख्याध्यापक रजनी सुरमारे,उपशिक्षक संजय गायकवाड,वैशाली वाणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य सरपंच व सदस्य आणि ग्रामस्थ यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया आणि शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुसई खु शाळा दत्तक घेतली असून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शाळेत सातारा पॅटर्न राबवणार आहे -विजय पवार
शिक्षण विस्तार अधिकारी जि प जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *