1 min read

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे चिंचखेडे बुद्रुक येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये 205 रुग्णांनी घेतला लाभ

Loading

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे चिंचखेडे बुद्रुक येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये 205 रुग्णांनी घेतला लाभ

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तर्फे हनुमान मंदिर चिंचखेडा बु. येथे नुकतेच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेशभाऊ पाटील जि. प. सदस्य जळगाव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. लक्ष्मीबाई तायडे सरपंच चिंचखेडा उपसरपंच अर्जुन इंगळे, पोलीस पाटील संजय तायडे, उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य शालेय व्यवस्थापन समिती महादेवभाऊ बावस्कर, प्रकाशभाऊ गावंडे यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुक्ताई आय केअर सेंटर मुक्ताईनगरचे संचालक डॉ. सुनील मेश्राम यांनी याप्रसंगी चिंचखेडा, डोलारखेडा, नांदवेल, वायला, टाकडी, महालखेडा येथील 205 रुग्णांची तपासणी केली तर अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 66 रुग्णांची निवड करण्यात आली याप्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे जळगाव जिल्हा दक्षता समितीचे सचिव गणेश कोळी सर यांनी सूत्रसंचालन केले प्रसंगी मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला प्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा या शिबिराचे आयोजक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी या शिबिराच्या संदर्भात उपस्थिताना मार्गदर्शन केले याप्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे जळगाव जिल्हा दक्षता समितीचे कोषाध्यक्ष प्रकाश सोनार तसेच गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल बावस्कर, महेंद्र गर्गे, प्रकाश गावंडे, अरुण खोंदले, ग्रामपंचायत सदस्य राजू पिळोदकर, ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप आमोदकर, शांताराम कांडेलकर आदींनी या शिबिराला सहकार्य केले. प्रसंगी गावकऱ्यांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिरास लाभला. मोतीबिंदू शस्त्रक्रिया मुक्ताईनगर येथील मुक्ताई आय केअर सेंटर डोळ्यांचे हॉस्पिटल, मुक्ताईनगर येथेच तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *