1 min read

के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयाच्या खेळाडू ची राज्यस्पर्धे साठी निवड….

Loading

के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयाच्या खेळाडू ची राज्यस्पर्धे साठी निवड….

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व नाशिक येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेत आयोजित १९ वर्षाआतील मुले-मुलींच्या शालेय कुस्ती स्पर्धेत अमळनेर येथील के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयाचा पहिलवानांनी उत्तम कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयातील खेळाडू १९ वर्षा आतील ९२ वजनी वयोगटात सैय्यद निजामअली हसनअली हा खेळाडू विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तराच्या स्पर्धेसाठी निवड झाली.तसेच नाशिक येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय श्री.छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम,नाशिक येथे झालेल्या विभागस्तरीय ज्युडो क्रीडा स्पर्धेत सैय्यद निजामअली हसनअली हा खेळाडू १९ वर्षाआतील -९० किलो वजनी गटात विभागस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरासाठी निवड झाली.तसेच १९ वर्षाआतील मुलीच्या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत खुशी विजय शिरसाठ ५२ किलो वजनगटात विभागस्तरावर दृत्तीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
तरी या सर्व विजयी खेळाडू चे के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालय तर्फे सत्कार करण्यात आला.या वेळी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश संदानशिव विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.ए.व्ही.नेतकर सर,संस्थेचे सरचिटणिस श्री.डी.डी.पाटील सर,श्री.नरेंद्रदादा संदानशिव,पर्यवेक्षक श्री.डी.एस.पाटील सर,सैय्यद हसनअली पहीलवान,श्री.आर.बी.शेलकर सर,श्री.एम.आर.सोनवणे सर,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या खेळाडूना प्राचार्य श्री.ए.व्ही.नेतकर सर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.एन.डी.विसपुते सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *