1 min read

प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या जीवनात सद्प्रवृत्ती व अखंड कृती आहे,निवृत्ती नाही- अरुण भाई गुजराथी बाबाजी परिवार तर्फे सेवानिवृत्ती प्रित्यर्थ प्राचार्य राजेंद्र महाजन यांना निरोप

Loading

प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या जीवनात सद्प्रवृत्ती व अखंड कृती आहे,निवृत्ती नाही: अरुण भाई गुजराथी
[ बाबाजी परिवार तर्फे सेवानिवृत्ती प्रित्यर्थ प्राचार्य राजेंद्र महाजन यांना निरोप ]

” प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या जीवनात सद्प्रवृत्ती व अखंड कृती असून निवृत्ती नाही.” असे गौरवोद्गार विधानसभेचे माजी सभापती अरुण भाई गुजराथी यांनी काढले .
परमश्रद्धेय स्वातंत्र्यसैनिक शाह गोवर्धनदास भिकारीदास उर्फ बाबाजी यांच्या स्मृतीदिन वंदना या घरगुती कार्यक्रम बुधवार दि .१८ जानेवारी २०२३ रोजी चोपडा येथील ‘ गोभिजीन ‘ स्मृतीस्थळ परिसरात साजरा झाला .गौरवपर भाषणात अरुणभाई पुढे म्हणाले की,” बिंदू आणि रेषा ही जगाची सर्वोत्तम भाषा आहे. महाविद्यालये संस्थेच्या नावलौकिकामुळे चालतात परंतू ललित कला केंद्र हे महाविद्यालय राजेंद्र महाजन सरांच्या उत्कृष्ट अध्यापन आणि मुल्याधिष्ठीत प्रशासनामुळे महाराष्ट्रात ख्यातीप्राप्त झाल्याने विद्यार्थी जास्त मिळत होते हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.ही बाब संस्थेला सदैव भुषणास्पद राहील .” महत्वपूर्ण कार्यक्रमात आप्तेष्टांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत ललित कला केंद्र चोपडा या कला महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांना सेवानिवृत्ती प्रित्यर्थ बाबाजी परिवारातील जेष्ठ सदस्य आदरणीय विठ्ठलभाई गुजराथी,वसंतभाई गुजराथी यांच्या हस्ते मायेची ” शाल ” देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी भगिनी मंडळ शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी,सचिव अश्विनी गुजराथी,प्रा.शा.म गुजराथी,चोपडा पिपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, भगिनी मंडळ शै.संस्थेतील प्राचार्य,मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सुत्रसंचलन व आभार उद्योजक आशिष अरुणलाल गुजराथी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *