धनदाई महाविद्यालयाचे खेडी येथे श्रमसंस्कार शिबिर
![]()




धनदाई महाविद्यालयाचे खेडी येथे श्रमसंस्कार शिबिर
अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन नुकतेच खेडी येथील प्राथमिक शाळेच्या आवारात संपन्न झाले. या सात दिवसीय शिबिराचे उद्घाटन भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले खेडी गावचे जवान श्री.शरद पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील हे विशेष अतिथी म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटमध्ये नव्याने निवडून आलेले प्राचार्य डॉ. के. बी. पाटील आणि प्रा. डॉ. संदिप नेरकर तर प्रमुख अतिथी म्हणून खेडीच्या सरपंच सौ. आशाबाई पाटील, उपसरपंच सौ शोभाबाई पाटील , ग्रामपंचायत सदस्य सौ. मंगलाबाई पाटील, सौ. मनीषा पाटील, निवृत्त प्राचार्य ज्ञानदेव देवराव पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रमोद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराचे प्रास्ताविक करतांना रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल इंगळे यांनी शिबिराचा उद्देश तसेच शिबिराची रूपरेषा स्पष्ट केली. यानंतर नवनिर्वाचित सिनेट सदस्य प्राचार्य के.बी. पाटील आणि प्रा. डॉ. संदिप नेरकर यांचा सत्कार करण्यात आला. दोन्ही मान्यवरांनी आभार व्यक्त करून एन एस एस शिबीर हे व्यक्तिमत्त्व घडविणारे व जीवनाला दिशा देणारे असते असे आपल्या मनोगतात स्पष्ट केले. आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी विद्यार्थ्यांना श्रम आणि शिस्तीचे महत्व स्पष्ट केले. तर ग्रामपंचायत सदस्य तथा निवृत्त प्राचार्य ज्ञानदेव पाटील यांनी गावातर्फे संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन शिबिरार्थींना दिले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात डी डी पाटील यांनी विद्यार्थ्यांना परिश्रम व चिकाटी हे यश प्राप्तीसाठी आवश्यक गुण असल्याचे सांगून जीवनात कधीही निराश न होता सतत प्रयत्न करीत रहा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ किशोर पाटील, आय. क्यु. ए. सी. समनव्यक डॉ. लिलाधर पाटील, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. महादेव तोंडे, रा. से.यो. महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. मिनाक्षी इंगोले, प्रा. प्रतिभा पाटील,प्रा. कैलास पाटील,श्री. कैलास आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शिबिरात महाविद्यालयाच्या 75 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असून यादरम्यान ग्रामस्वच्छता, श्रमदान व विविध विषयांवरील व्याख्यानाचा लाभ होणार आहे.

