मी आठवणीत पुन्हा हरवतोय
![]()

मी आठवणीत पुन्हा हरवतोय
नाशिकला मी शासकीय योजनेत घर घेतलीतले होते. जी आय ए एस च्या योजनेतून हे घर आदरणीय बी. एस .सुर्यवंशी शिक्षणाधिकारी यांच्या पुढाकाराने या योजनेत जळगाच्या पाच-सहा गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणविस्तार अधिकारीही होते. पंधरा वर्ष कर्जफेड आणि निवृत्त होताना व्याज फेड असे आठ लक्ष पंचवीस हजारात अपार्टमेंटमध्ये हे घर घेतले. आयुष्यातले पहिलेच हे घर होते. अगदी सहज शासकीय योजनेत नवनिशांत हौसिंग सोसायटी नाशिक मध्ये सभासद होऊन हे घर घेतले. तेव्हा मी गटशिक्षणाधिकारी भुसावळ होतो. माझे मोठे भाऊ नाशिकला आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी होते. दोन धृव जवळ येतील असे वाटतले होते. आनंदात मी नाशिक जिल्ह्यात बदलीसाठी अर्जही दिला होति. आद. सुर्यंवशी साहे नाशिकला अर्जही दिला. सुर्यवंशी साहेबांनी बदलीची हमी घेतल्यानेच बदलीही इगतपूरी येथे गटशिक्षणाधिकारी पदावर झाली. यात माझे मोठे भाऊंचीही मदत झाली. शिक्षण मंत्री मा. ना. वसंतराव पुरके यांचे मोठे भाऊंचे वैयक्तिक स्नेह होता. बदलून इलो पण काही अडचणी कौटुंबिक आल्यात मोठी मुलगी मेघा हीचा शिरपूरला डी. एड. ला नंबर लागला होती. ती एकटीच शिरपूर येथे वस्तीगृहात राहत होती. तिला तिथे करमत नव्हते.मी दरम्यान इगतपूरी येथून पुन्हा एका वर्षातच बदलीचा अर्ज नाशिकला शासकीय कन्या शाळेत दिला होता कन्या शाळेत माझी बदली गुरुवर्य डॉ. पानतावणे सरांनी नाशिकला मा. शिक्षण मंत्री ना. वसंतराव पुरकेंना विनंती पत्र लिहून करुन दिली होती. शासकीय कन्या शाळेत माझी लहान मुलगी अस्मिता ही दहावीला माझे शाळेत माझी विद्यार्थीनीही होती. तिचे दहावी झाले नंतर मोठ्या मुलीकडे जाणे आवश्यक होते तेव्हा शिरपूरलाही मी बदलीचा अर्ज दिला.उषा आणि लहान मुलगी शिरपूरला शिफ्ट झालेत.माजी. शिक्षणमंत्री मा.अमरीशभाई पटेल यांनी माझ्या बदलीची शिफारस केली होती. बदली लगेचच झाली नाही.दोन वर्षात तिसरी बदली अशक्य आहे. म्हणून अजून एक वर्षे शाळेत काढून. पुढच्या वर्षी बदलीस पुन्हा अर्ज दिला. २००८ मेच्याही जनरल बदल्या झाल्यात माझे नावच यादीत नव्हते. अधिकारी मित्र म्हणायचे तीन वर्षे एका पदावर
झालेशिवाय बदली अशक्य आहे. २००५ मी इगतपूरी नंतर शासकीय कन्या विद्यालय नाशिक आता पुन्हा शिरपूर. तीन वर्षे झाली नव्हती. मला कुटुंबसाठी बदली आवश्यक होती. जून २००८ला मला विरोधी पक्षनेते विधाससभा मुंबई महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडून अचानक फोन आला. मी भुसावळ येथे गटशिक्षणाधिकारी असताना बोदवड पंचायत समितीचाही प्रभार माझेकडे होता. त्यामुळे मा. खडसे साहेबांनी माझा कामाचा पूर्वानुभव लक्षात घेऊन मुक्ताईनगरला बदलीसाठी माझी शिफारस केली. शिरपूरसाठी मा. माजी शिक्षणमंत्री मा. अमरीशभाईंनीही बदलीसाठी पुन्हा शिफारस केलेली होती. मेघा,मोठ्या मुलीचे डीएडचे शेवटचे वर्षे सुरु झाले होते. अस्मिताचेही बारावीचे वर्षे सुरु होते. कुटुंबापासून प्रथमच दोन वर्षे आम्ही एकमेकांपास्नं लांब होतो. अखेर माझी बदली मुक्ताईनगरला एका महिन्यात म्हणजे आठ ऑगष्ट २००८ ला झाली. मला अजून एका पदावर तीन वर्षे झालेली नव्हती. मा. खडसेबांनी जोरदार शिफारस करुन मा. मुख्यमंत्री ना. विलासराव देशमुख यांना विनंती करुन मुक्ताईनगरला माझी बदली केली.एक वर्षे पुन्हा मला एकट्याला राहावे लागले. शिरपूरहून मोठ्या मुलीचे डी.एड. ७५% गुण मिळवून पास होऊन यशस्वी झाली होती. लहान मुलगी
अस्मिताही ८६%गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आली होती. या बदललीने.आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो होतो. दरम्यान माझे कविता लेखन बहरले होते. बेट बंद भावनेचे हा नवा संग्रह प्रकाशित झाला होता.पुढे पदोन्नतीने शिक्षणाधिकारी जळगाव,शिक्षणाधिकारी बीड,विभागीय सचिव लातूरबोर्ड यापदावर सेवा करून निवृत्तही झालो. लगेचच एन. जी .ओ. प्लँस्टीही झाली. पुढे करोनाने घेरले मृत्यूच्या दाढेतून परत सुखरुप आलो. माझे पहिले घर ते कधी तरी स्वप्नातले होते. ते पुन्हा स्वप्नात येऊ लागले होते. त्या घरात वीज डिस्कनेट होती,पाणी नव्हते,घर धुळीने भरलेले होते, भितींचे रंग उडालेले होते आणि घरात माझी विकत घेऊन संग्रही असलेली पुस्तकेही केवीलवाणी होऊन माझी वाट पहात होती. आठ दिवस झालेय मी नाशिकला आलोय. घराला पुन्हा सजवतोय आहे. वीज,आलीय,पाणी आलेय,गँस आलाय घराचे रिनिन्युव्हेशन करतोय. पुस्तके आवरतोय. किती तरी पुस्तके वाचलेली भेटली,न वाचलेली पुस्तके स्पर्शाची वाट पाहताय. एकेक पुस्तक स्पर्शतोय. अस्मितादर्श चा एमेजू २००६चा अंक हाती लागलाय या अंकातील पाच कविता जणू काही मला मिठीत घेताहेत असाच भास होतोय. घरही मला थोपटतेय. मी आठवणीत पुन्हा हरवतोय. शशिकांत हिंगोणेकर ७२१८७९२१८६ २०जाने. २०२३

