वरुळ
सरपंच रेखाबाई पाटील यांचा सत्कार
![]()

वरुळ
सरपंच रेखाबाई पाटील यांचा सत्कार
शिंदखेडा तालुक्यातील वरुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी रेखाबाई राजेंद्र पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा निवासस्थानी, छोटेसे सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मान्यवरांच्या हस्ते,सत्कार करण्यात आला
यावेळी भडणे येथील माजी सरपंच देवेसिग, गिरासे,भडणे येथील आदर्श पोलीस पाटील युवराज माळी शिंदखेडा येथील अनिल पाटील निलेश पाटील, दत्तु पाटील, प्रमोद पाटील विजय पाटील गोपाल राजपूत रणजित गिरासे,नानाभाऊ, कोळी गोविंदा पाटील वैभव राज पाटील, यावेळी उपस्थित होते मान्यवरांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित सरपंच रेखाबाई राजेंद्र पाटील यांच्या सत्कार करण्यात आला, यावेळी नवनिर्वाचित सरपंच रेखाबाई पाटील यांनी गावाच्या विकासासाठी आपण नेहमी सदैव प्रयत्नशील राहील तसेच गावातील गटारी साफसफाईआरोग्य शिक्षण रस्ते समस्या सोडवण्यासाठी नेहमी कटी बद्दल राहील व गावकराच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर राहील अशा आशावाद सत्काराला उत्तर देताना सांगितले

