1 min read

शिवदास माळी यांना इनोव्हेशन अँवॉर्ड

Loading

*”शिवदास माळी यांना इनोव्हेशन अँवॉर्ड . “*

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन च्या वतीने देण्यात येणारा “सर फाऊंडेशन नॅशनल अॅवॉर्ड 2022” देशभरातील प्रयोगशील शिक्षक आणि क्षेत्रीय अधिकारी यांना जाहीर झाला आहे .ह्यामध्ये दहिवद ता. अमळनेर जि. जळगाव येथील पालघर जिल्ह्यात जि. प. शाळा देवजी पाटीलपाडा ता.तलासरी येथे प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेले श्री शिवदास लक्ष्मण माळी यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारे तज्ञांच्या समितीने ही निवड केली आहे. या पुरस्काराचे वितरण मार्चमध्ये होणाऱ्या विशेष शैक्षणिक नवोपक्रम परिषदेत होईल यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत . शिवदास माळी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने दहिवद गावातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.