आदिवासी विकास विभाग तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता कक्ष (ERC) अंतर्गत दोन दिवसीय शैक्षणिक परिषद उत्साहात संपन्न !….
![]()
आदिवासी विकास विभाग तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता कक्ष (ERC) अंतर्गत दोन दिवसीय शैक्षणिक परिषद उत्साहात संपन्न !….
मा.ज्ञानेश्वर महाजन व मा.मिलिंद पाईकराव यांनी कृतीयुक्त उपक्रमांद्वारे दिले अनमोल मार्गदर्शन !…..

प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर
आदिवासी विकास विभाग तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता कक्ष (ERC) मार्फत आयोजित दोन दिवसीय EduFest (शैक्षणिक परिषद) माननीय प्रकल्पाधिकारी विनिता सोनवणे मॅडम, श्री. पवन पाटील सर (स.प्र.अ.शिक्षण) तसेच क.शि.वि. श्रीम. सुलताणे मॅडम, श्री.एल.एम.पाटील सर यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दहिवद, ता. अमळनेर, जि. जळगांव येथे संपन्न झाली. सदर शैक्षणिक परिषदेत अमळनेर केंद्रांतर्गत सर्व शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळेतील इ. १ ली ते ७ वी च्या सर्व शिक्षकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
या शैक्षणिक परिषदेमध्ये सर्व शिक्षकांनी कृतीयुक्त सहभाग नोंदवून परिषदेचा आनंद घेतला. सदर परिषदेतून आलेला नवीन आणि चांगला अनुभव प्रशिक्षणार्थींनी आपल्या प्रतिकियेतून व्यक्त केला. याचा वापर विद्यार्थांच्या गुणवत्तेसाठी नक्की करू अशी ग्वाही सर्व शिक्षकांनी दिली. प्रथमच अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आदिवासी विकास विभागाकडून शैक्षणिक कक्ष स्थापन करण्यात येऊन शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आल्याने सर्व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला.
या EduFest ( शैक्षणिक परिषदेला ) विषयमित्र श्री. ज्ञानेश्वर महाजन व श्री.मिलिंद पाईकराव यांनी कृतीयुक्त उपक्रमांद्वारे अनमोल असे मार्गदर्शन केले. या परिषदेसाठी शासकीय आश्रमशाळा दहिवद, ता. अमळनेर, जि. जळगांव येथील सर्व कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.

