टिळकनगर हायस्कूल डोंबिवली येथे ३३ वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्त विद्यार्थी जनजागृती शिबिर संपन्न .
![]()


टिळकनगर हायस्कूल डोंबिवली येथे ३३ वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्त विद्यार्थी जनजागृती शिबिर संपन्न .
ठाणें कल्याण::(मनिलाल शिंपी): टिळकनगर हायस्कूल डोंबिवली पूर्व येथे ३३ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान निमित्त वाहतूक नियम जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी परिवहन अधिकारी मोटार वाहन निरीक्षक अमोल पवार,यांचा प्रमुख उपस्थितीत, आर एस पी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांचा सहकार्याने टिळकनगर हायस्कूल डोंबिवली पूर्व येथे ३३वा रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापिका रंजना चंद्रममोरे यांनी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी व मोटार वाहन निरीक्षक अमोल पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे,हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे हे किती महत्वाचे आहे याविषयी अमोल पवार यांनी व्हिडिओ , पिपीटी द्वारे मार्गदर्शन केले.तसेच मनिलाल शिंपी यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून वाहतुकीचे नियम आपल्या सह सर्वांनी पाळावेत यासाठी सर्व मुलांनी जनजागृती करावी यासाठी वाहतूक नियम पाळण्याची प्रतिज्ञा करून घेतली.यावेळी टिळकनगर हायस्कूल ,डोंबिवली मुख्याध्यापिका रंजना चंद्रममोरे यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले. यावेळी सहशिक्षक श्री.संजय भोये, सेवक धुमाळ, यांनी विशेष सहकार्य केले.आर एस पी अधिकारी शिक्षक श्री.निवृत्ती खराटे यांनी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम कळावेत, यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले.

