1 min read

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जळकोट तालुका सरचिटणीसपदी अतनूर येथील माजी सैनिक अरविंद माधवराव सासट्टे यांची निवड

Loading

सरचिटणीस पदी अरविंद सासट्टे
अतनूर / प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जळकोट तालुका सरचिटणीसपदी अतनूर येथील माजी सैनिक अरविंद माधवराव सासट्टे यांची निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आ.धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जळकोट काँग्रेस कमिटीचे तालुकाअध्यक्ष मारुती पांडे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष धनराज दळवे-पाटील, उपाध्यक्ष गोविंद कोकणे, अनुसूचित जाती जळकोट तालुका सचिव संग्राम घुमाडे, तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष नितीन सोमुसे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *