डोंबिवली येथे विभागीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन. मोबाईल ने माणूसपण खिशात घातले.
गुलाबराव पाटील
![]()

डोंबिवली येथे विभागीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन. मोबाईल ने माणूसपण खिशात घातले.
– गुलाबराव पाटील
ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी)- पंचायत समिती कल्याण शिक्षण विभागामार्फत गार्डियन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज डोंबिवली येथे दोन दिवसीय तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेले आहे तालुक्यातून प्राथमिक 43 व माध्यमिक 32असे एकूण 75 शाळांनी सहभाग नोंदवला आहे .विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गुलाबराव पाटील मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकारी मीनाक्षी गागरे, गट शिक्षणाधिकारी रूपाली खोमणे,शिक्षण विस्तार अधिकारी विजया नाईकवाडी,दळवी मॅडम, गार्डियन कॉलेजच्या मुख्याध्यापिका नायर मॅडम, मेनन मॅडम ,परीक्षक माधव पाटील, वैशाली ठाकरे, अनिता घाडगे, नर्मदा दासरी तसेच पंचायत समितीचे रामभाऊ शिरोळे,विठ्ठल भोईर उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेतील बाल वैज्ञानिकाच्या भूमिकेतील इयत्ता सातवी चा विद्यार्थी हर्ष चव्हाण याने अध्यक्ष स्थान भूषविले व त्याच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. गुलाबराव पाटील आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना म्हणाले तुम्ही या देशाचे भावी शास्त्रज्ञ आहात. चिकित्सक आणि संशोधक राहिलात तर आपल्या कला गुणांना वाव मिळेल .मोबाईल पासून दूर राहा. मोबाईल ने आपले माणूस पण खिशात घातले आहे .माणसा – माणसा मधील संवाद दुरावत चालला.आपल्याला विज्ञानाच्या प्रात्यक्षिकातून, अनुभवातून आयुष्य घडवायचे आहे.हर्ष चव्हाण म्हणाला आपल्या देशात चांगले शास्त्रज्ञ निर्माण झाले तर देशाची प्रगती होईल. सुंदर असे स्वागत गीत मानपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी विजया नाईकवाडी यांनी केले तर आभार शर्मिला पष्टे यांनी मानले.

