1 min read

राज्यस्तरीय वाद विवाद स्पर्धेत धरणगाव महाविद्यालय प्रथम !….

Loading

▪️राज्यस्तरीय वाद विवाद स्पर्धेत धरणगाव महाविद्यालय प्रथम !….

🔸कु.देवेश्रीमहाजन हिला उत्तेजनार्थ प्रथम !…

🔹कु. मृणाल भावसार द्वितीय क्रमांक !…

🔸शिक्षिका सौ.आर.सी. पवार मॅडम यांना सन्मान चिन्ह व प्रशिस्तपत्र देऊन गौरव !…

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – येथील कला,वाणिज्य,आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय धरणागव येथील विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव आयोजित वादविवाद स्पर्धा दि.१२/१/२०२३ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत धरणगाव कॉलेज मधील विद्यार्थिनी यांनी सांघिक प्रथम क्रमांक पटकावला रुपये ५००० हजार व फिरता चषक प्रदान करण्यात आले.तसेच कु.देवेश्री महाजन हिला उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळाला पारितोषिक रुपये ७०० तसेच सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.तसेच मृणाल भावसार हिला वैयक्तिक द्वितीय क्रमांक रुपये १५०० व सन्मान चिन्ह देण्यात आले.
या संघाचे प्रमुख मार्गदर्शक ,आदर्श शिक्षिका सौ.आर.सी.पवार मॅडम यांना सन्मान चिन्ह व प्रशिस्त पत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थी , विद्यार्थिनी व संघाचे प्रमुख यांनी अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी यांच्या बळावर यश प्राप्त केले. पी.आर.हायस्कूल सोसायटीच्या येशात मानाचा तुरा रोवला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी,उपाध्यक्ष श्री. व्ही. टी. गालापुरे सर, सचिव डॉ.मिलिंद डहाळे, संचालक श्री.अजय भाऊ पगारिया, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एम.पाटील, उप प्राचार्य प्रा.डॉ. ए.डी.वळवी, उप प्राचार्य प्रा.आर.आर.पाटील , पर्यवेक्षक प्रा.बी.एल.खोंडे, ग्रंथपाल प्रा.पी.आर. देशमुख, कार्यालयीन अधीक्षक प्रा.डी.जी. चव्हाण तसेच प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर बंधू यांनी विजयी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच संघाचे प्रमुख प्रा.सौ.आर. सी.पवार मॅडम यांचे अभिनंदन करण्यात आले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *