1 min read

जि.प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न…

Loading

जि.प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न…

अमळनेर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांचे अध्यक्षतेखाली साने गुरुजी सभागृह पंचायत समिती अमळनेर येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी मंचावर गटविकास अधिकारी विशाल शिंदे, जि.प.उपअभियंता पी.ए.पाटील, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी सुधीर पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी.धनगर व रावसाहेब पाटील, पश्चिम सोसायटीचे व्हाईस चेअरमन अशोक इसे, केंद्रप्रमुख शरद सोनवणे, दिलीप सोनवणे, विश्वास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रविण वाडीले आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात वैयक्तिक क्रीडा- सांस्कृतिक प्रकारातील विजेता, उपविजेता, प्रथम, द्वितीय, तृतिय, उत्तेजनार्थ स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व सांघिक क्रीडा प्रकारातील विजेता व उपविजेता संघांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूंनाही सहभागाबद्दल प्रमाणपत्र संबंधित विभागामार्फत देण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेणारे क्रीडा समन्वयक सुनिल वाघ व स्पर्धा समन्वयक दत्तात्रय सोनवणे यांना उल्लेखनीय कार्याबद्दल स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा समितीचे सचिव तथा गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी सादर केले, सुत्रसंचालन दत्तात्रय सोनवणे व आभार प्रदर्शन शरद सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तात्रय सोनवणे, सुनिल वाघ, विलास मोरे, ज्ञानेश्वर कुवर, हिरालाल पाटील, अशोक पाटील, तुषार बाविस्कर, छाया इसे, शितल पाटील, क्रांती पाटील आदींनी सहकार्य केले.

स्पर्धेतील विजयी संघ व स्पर्धक पुढीलप्रमाणे
कबड्डी (पुरुष गट)
विजेता संघ – मारवड बीट (शिक्षक)
उपविजेता – अमळगाव बीट (शिक्षक)
कबड्डी (महिला गट)
विजेता संघ – महिला मंच (शिक्षिका)
खो-खो (पुरुष गट)
विजेता संघ – मारवड बीट (शिक्षक)
उपविजेता – जैतपिर केंद्र (शिक्षक)
खो-खो (महिला गट)
विजेता संघ – महिला मंच (शिक्षिका)
व्हॉलीबॉल (पुरुष गट)
विजेता संघ – पाणी पुरवठा विभाग
उपविजेता – मारवड बीट (शिक्षक)
क्रिकेट (पुरुष गट)
विजेता संघ – जानवे केंद्र (शिक्षक)
उपविजेता – पंचायत समिती कार्यालय
बॅडमिंटन (पुरुष गट)
विजेता – डॉ.अतुल चौधरी (शिरुड)
उपविजेता – प्रविण पाटील (पिंगळवाडे)
बॅडमिंटन (महिला गट)
विजेता – पुनम मोरे (ढेकूसिम)
उपविजेता – छाया इसे (मठगव्हाण)
कॅरम (पुरुष गट)
विजेता – गणेश गवळी (बांधकाम)
उपविजेता – मनोहर चौधरी (गलवाडे)
उत्तेजनार्थ – विकास पाटील (खडके)
कॅरम (महिला गट)
विजेता – पुनम मोरे (ढेकूसिम)
उपविजेता – छाया इसे (मठगव्हाण)
बुध्दिबळ (पुरुष गट)
विजेता – योगेश खांबोरे (बांधकाम)
उपविजेता – दिपक बोरसे (बांधकाम)
उत्तेजनार्थ – निंबाजीराव पाटील (चोपडाई)
बुध्दिबळ (महिला गट)
विजेता – मंगला नांगरे (तासखेडा)
उपविजेता – पाकिजा पिंजारी (वावडे)
उत्तेजनार्थ – शितल पाटील (धार)
सांस्कृतिक विभाग
गायन स्पर्धा (पुरुष गट)
प्रथम – सुधीर चौधरी (तांदळी)
द्वितीय – प्रदीप कंखरे (अंबारे)
तृतिय – प्रविण पाटील (पिंगळवाडे)
उत्तेजनार्थ – ज्ञानेश्वर कुवर (जळोद)
गायन स्पर्धा (महिला गट)
प्रथम – मनिषा पाटील (सडावण)
द्वितीय – सुषमा तायडे (सावखेडा)
तृतिय – दिपाली निकुंभ (वाघोदा)
उत्तेजनार्थ – भारती पाटील (मंगरुळ)
नृत्य स्पर्धा (महिला गट)
प्रथम – डॉ.पूजा वाघुले (गांधली)
नाटिका स्पर्धा (पुरुष गट)
प्रथम – प्रदिप कंखरे (अंबारे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *