1 min read

जिजाऊंनी समाजाला कर्मकांडातून बाहेर काढले…
-भरत शिरसाट.

Loading

जिजाऊंनी समाजाला कर्मकांडातून बाहेर काढले…
-भरत शिरसाट.


.साळवे इंग्रजी विद्यालयात आज राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रमुख व्याख्याते म्हणून समता शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा.भरत शिरसाट, एंरडोल हे होते.
अत्यंत प्रगत व आधुनिक विचार असणाऱ्या म्हाळसा राणीच्या पोटी जन्मलेल्या मा जिजाऊ या प्रखर विज्ञान निष्ठ होत्या. राजे लखूजी जाधव यांची निजामाने हत्या केल्यानंतर आई म्हाळसा राणी या सती गेल्या नाहीत. तसेच राजे शहाजी यांचे निधन झाल्यावर मा जिजाऊ सुद्धा सती गेल्या नाहीत. त्याचबरोबर आपल्या राज्यातील महिलांना सुद्धा सती जावे लागू नये म्हणून त्यांनी दंडक निर्माण केला होता. आपल्या राज्यातील महिलांना एक सुरक्षित जीवन त्यांनी प्रदान केले होते. समाजाला अंधश्रद्धा आणि कर्मकांडातून बाहेर काढून आपले राज्य अंधश्रद्धा मुक्त केले होते. मुरार जगदेव या आदिलशहाच्या सरदाराने पुण्यात गाढवाचा नांगर फिरवलेला असताना, पहार रोवलेली असताना त्या जमिनीवर सोन्याचा नांगर फिरवून त्याचे पूजन विधवा आई म्हाळसा राणी व विधवा वहिनी यांच्या हस्ते मा जिजाऊंनी घडवून आणले होते. समाजाला असा पुरोगामी विचार देणाऱ्या जिजाऊ या आधुनिक भारताच्या पहिल्या महिला होत्या. स्त्रीला कमजोर आणि चूल आणि मूल पर्यंत मर्यादित ठेवणाऱ्या मनुवादी व्यवस्थेला ठोकर मारत त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी घोड्यावर बसून लढाया लढल्या आणि समाजाला गनिमांपासून वाचविले. सर्वच जाती-धर्माच्या मावळ्यांचा वापर करून शिवबाच्या सामर्थ्याने स्वराज्य उभे केले. असे प्रतिपादन आपल्या व्याख्यानामध्ये भरत शिरसाठ यांनी केले. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींवर सुद्धा त्यांनी प्रबोधन केले.
याप्रसंगी कार्यकमाचे अध्यक्ष डॉ गिरीश नारखेडे, ग्राम सुधारणा मंडळ हे होते. त्याहस्ते खर्दे,उखळवाडी,कामतवाडी येथील लोकनियुक्त सरपंचांचा सत्कार करण्यात आला. ग्राम सुधारणा मंडळाचे सचिव डॉ चंद्रकांत नारखेडे यांच्या हस्ते वक्रूत्व व पोवाडा गायन स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ आर पी नेहेते यांनी केले, प्रास्ताविक प्र मुख्याध्यापक ए एस पाटील यांनी केले, आणि आभार सौ एन बी पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन एस डी मोरे, यांनी केले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ प्रतिभा पाटील मँडम, ए वाय शिंगाणे, एस.पी तायडे, एस व्ही राठोड, जी व्ही नारखेडे,बी आर बोरोले, व्ही एस कांयदे आणि कर्मचारी बंधूंनी परिश्रम घेतले.🙏💐💐💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *