नॅशनल उर्दू स्कूल कल्याण येथे रस्ता सुरक्षा कार्यशाळा संपन्न.
![]()

नॅशनल उर्दू स्कूल कल्याण येथे रस्ता सुरक्षा कार्यशाळा संपन्न.
अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक शाळेत आर एस पी युनिट सुरू करणे आवश्यक आहे.::डॉ. मनिलाल शिंपी
मुंबई,ठाणे:: (मनिलाल शिंपी) ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत , वाहतूक एसीपी श्री.मंदार धर्माधिकारी, यांचा नेतृत्वाखाली कल्याण पश्चिम वाहतूक उपशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांचा मार्गदर्शनाखाली ३३ वा रस्ता सुरक्षा अभियान अतिशय स्तुत्य उपक्रम राबविले जात आहेत. आज कल्याण येथील नॅशनल उर्दू स्कूल दुर्गाडी येथे मुख्याध्यापक अब्दुल्ला खान यांच्या अध्यक्षतेखाली, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव व आर एस पी कमांडर आणि मनिलाल शिंपी यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे किती आवश्यक आहे या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. वाहतूक पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव यांनी संगणकाच्या माध्यमातून व चित्रफित दाखवून नॅशनल उर्दू शाळेतील विद्यार्थिनींना वाहतुकीचे नियम पाळणे का आवश्यक आहे व वाहतुकीचे नियम आपण जर पाळले नाहीत तर आपल्याला काय नुकसान होते याबाबत सखोल माहिती व आजपासूनच आपण आपल्या पालकांमध्ये आणि समाजामध्ये हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट लावणे, विदाऊट लायसन गाडी न चालवणे याबत जनजागृती करावी अशी सर्व विद्यार्थिनींकडून सार्वजनिक प्रतिज्ञा घेतली. आर एस पी अधिकारी युनिट डॉ. मनिलाल शिंपी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक शाळेतून रस्ता सुरक्षा बद्दल नियमांची माहिती दिली पाहिजे, त्यासाठी प्रत्येक शाळेत आर एस पी युनिट सुरू करणे आवश्यक आहे.कारण तुम्ही सर्व विद्यार्थी स्वतंत्र भारताचे उद्याचे भविष्य अहात.म्हणून आपल्या पालकांना बाईक चालवताना हेल्मेट घालायला सांगा, कार चालवताना सीटबेल्ट वापरणे आवश्यक आहे, असे विद्यार्थी जेव्हा सांगतील तेव्हा आपल्या देशात खऱ्या अर्थाने रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी झाले असे म्हणता येईल.मुख्याध्यापक अबदुल्ला खान यांचासह शाळेतील श्रीमती नुझात मॅडम,
शबनम मॅडम, रशिदा मॅडम, रुक्साद मॅडम,
शसिदा मॅडम, निदा मॅडम, तब्बासुम मॅडम
यांनी विशेष सहकार्य केले.आर एस पी जिल्हा उपसमादेशक जितेंद्र सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक बंधू-भगिनींचे आणि विद्यार्थीनिंचे आर एस पी अधिकारी शिक्षक शरद बोरसे यांनी आभार व्यक्त केले.

