1 min read

सम्राट अशोक विद्यालयात राजमाता जिजाऊंची जयंती प्रचंड उत्साहात साजरी.

Loading

सम्राट अशोक विद्यालयात राजमाता जिजाऊंची जयंती प्रचंड उत्साहात साजरी.

ठाणे कल्याण (मनिलाल शिंपी ) – कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयात शिक्षक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत ढोल ताशाच्या गजरात महिला पालकांचे स्वागत करत राजमाता जिजाऊंची जयंती साजरी केली. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सम्राट अशोक विद्यालयात महिला पालकांना राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत बोलावले होते पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपस्थिती दर्शविली. वर्गवार विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमवेत आपल्या आईला गुलाब पुष्प देत स्वागत केले.व पालकांचे चरण स्पर्श करत शुभ आशीर्वाद घेतले. कार्यक्रमाप्रसंगी पालकांचे डोळे भरून आले तसेच पालक भावनिक झालेत.मोबाईल, टी व्ही मुळे पालक विद्यार्थी यांचा संवाद दुरावत चालला. पालक विद्यार्थी यांच्यात खेळीमेळीचे वातावरण रहावे म्हणून राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने संदेश देण्याचा प्रयत्न केला.असे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील म्हणाले. कार्यक्रमाला पालक प्रतिनिधींसह प्राथमिक मुख्याध्यापिका सुजाता नलावडे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील व इतर शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी काळे यांनी केले तर आभार संतोष कदम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *