1 min read

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जंयती निमित्त वृक्षारोपण

Loading

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जंयती निमित्त वृक्षारोपण

लोणी काळभोर- तिर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसर ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग लोणी आयोजित एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी स्वामी विवेकानंद जंयती तसेच राजमाता जिजाऊ जंयती निमित्त भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी वड,पिंपळ, कडुनिंब, करज,फणस,करंज उंबर अशा जंगली वृक्षांची लागवड ग्रीन फाऊंडेशन सदस्य श्री.दादासाहेब कोळपे
यांच्या हस्ते करण्यात आली .या वेळी ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री.अमित जगताप, नर्सरी उद्योजक श्री.प्रकाश काळभोर, युवा उद्योजक आकाश काळभोर, ग्रीन फाऊंडेशन सदस्य श्री. दादासाहेब कोळपे,ग्रीन फाऊंडेशन हवेली तालुका संपर्क प्रमुख श्री.बाबासाहेब यादव, ग्रीन फाऊंडेशन सदस्य बिरूदेव भास्कर, तसेच आकाश काळभोर मित्र परिवार, ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य उपस्थित होते.
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांची तारखेनुसार 425 वी जयंती आहे.राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना मॉं साहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले. जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला. जिजाऊंच्या संस्कारात शिवाजी महाराजांचे संगोपन झाले आणि यातूनच त्यांना आपल्या दीनदुबळ्या शोषीत कष्टकरी प्रजेसाठी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. जिजाऊंच्या वडिलांचे नाव लघुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. जिजाऊंना चार भाऊ होते. दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी असे जिजाऊंच्या भावांची नावे होती. जिजाऊ दांडपट्टा आणि अश्वारोहण या युद्ध कलांमध्ये पारंगत होत्या. अशी महिती आकाश काळभोर यांनी दिली.

तसेच या वेळी नरेंद्रनाथ दत्त म्हणजेच स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्ता येथे १२ जानेवारी १८६३ मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुनेश्वरीदेवी असे होते. स्वामी विवेकानंदांचे आजोबा दुर्गाचरण दत्त हे “संस्कृत” व “परीक्षण’ भाषेचे एक विद्वान होते.नरेंद्रनाथ यांच्‍यावर लहानपणापासूनच महाभारत, रामायण व भक्तिभावा चा प्रभाव होता, कारण त्यांचे आई त्यांना ह्या गोष्टी सांगत असे. स्वामी विवेकानंद यांना वाचनाची खूप आवड होती आणि ते शाळेत सुद्धा सर्वात हुशार विद्यार्थी होते. फक्त अभ्यासातच नाही तर ते खेळण्यात हि तितकेच तरबेज होते. शाळेमध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये ते भाग घेत असे.स्वामी विवेकानंद यांना वाचनाची खूप आवड होती त्यांनी रामायण, महाभारत, भगवत गीता, वेद आणि पुराण अशा धार्मिक पुस्तकांचे ज्ञान मिळवले होते. इतकेच नाही तर त्यांनी भारतीय गायन सुद्धा शिकले होते अशी माहीती ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *