वैज्ञानिक संकल्पनेतून समाजाला संदेश देता आला पाहिजे…
तहसीलदार
मिलिंदकुमार वाघ
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न…
![]()

वैज्ञानिक संकल्पनेतून समाजाला संदेश देता आला पाहिजे…
तहसीलदार
मिलिंदकुमार वाघ
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न…
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत संधीचे सोने केले आहे.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मॉडेल तयार करून आपल्या भविष्यातील वैज्ञानिकतेकडे पाऊल टाकले आहे.जोपर्यंत आपल्या मनात प्रश्न निर्माण होत नाही तोपर्यंत संकल्पना तयार होत नाही. म्हणून आपण स्वत: कोणत्याही विषयात स्वतःला झोकून द्या तरच तुमची भविष्याती स्वप्न साकार होतील व आपण विज्ञान प्रदर्शनात तयार केलेल्या वैज्ञानिक संकल्पनेतून समाजाला चांगला संदेश देता येईल असे भरवस येथील शिक्षण विभाग पंचायत समिती व कै श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस तालुका अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने 50 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून अमळनेर तालुक्याचे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ मार्गदर्शन करतांना बोलत होते.
व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ संजय सोनवणे, उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील,यावल कॉलेजच्या प्राचार्या डॉ संध्या सोनवणे, भरवस हायस्कूलचे मुख्याध्यापक व तथा सचिव विजय सोनवणे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी तालुकाध्यक्ष एम.ए पाटील, निम हायस्कूलचे मुख्याध्यापक ए .बी चौधरी, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे ,गणित मंडळाचे अध्यक्ष डी.ए धनगर, परीक्षक यशश्री जगताप, केंद्रप्रमुख शरद सोनवणे,शिक्षक संघटनेचे पी.बी.बोरसे,
पत्रकार उमेश पाटील ,ईश्वर महाजन होते.
विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थी साहिल पाटील व शिक्षकांमध्ये मिलिंद पाटील व परीक्षक डी.ए धनगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विज्ञान प्रदर्शनाला मार्गदर्शन करतांना यावल काँलेजच्या प्राचार्य डॉ संध्या सोनवणे म्हणाले की समस्यांचे निराकरण करणारा विद्यार्थी भविष्यात शास्त्रज्ञ होतील असे सांगत उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात तयार केलेल्या प्रतिकृती कल्पनाशक्तीला वाव देणा-या आहेत असे सांगितले.
दोन दिवसीय तालुका विज्ञान प्रदर्शनात परीक्षक म्हणून डी.ए धनगर ,पी डी पाटील,डी.व्ही.भलकर,
यशश्री जगताप यांनी काम पाहिले तर तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक गटातून १५० मॉडेल्स होते. प्राथमिक माध्यमिक गटातील विद्यार्थी शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन भरवस शाळेच्या सोनवणे मॅडम यांनी केले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे भरवस शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेचे सचीव विजय सोनवणे यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी केला.
निकाल खालीलप्रमाणे
माध्यमिक गट विद्यार्थी
इयत्ता नववी ते बारावी
प्रथम विजेता
साईराज अशोक रोझेेकर
( स्मार्टहोम)
साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय
द्वितीय
साई नंदू मोरे
हितेश पाटील
विजय नाना आर्मी
( प्लेस्टो स्कोप)
तृतीय
राज प्रवीण पाटील
जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय
( लसावी मसावी काढण्याची आधुनिक पद्धत)
उत्तेजनार्थ
कांचन राडोळ
शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे
(वजनकाटा)
प्राथमिक गट-इयत्ता ६ वी ते ८ वी


प्रथम-उज्ज्वल पाटील
सेंटमेरी इंग्लिश मेडियम स्कूल
(लाय फाय)
द्वितीय-अश्विनी पाटील
सानेगुरुजी कन्या विदयालय
(रस्ते अपघात यंत्रणा)
तृतीय
मुस्कानबी वकीलखा
(गणितीय युक्त्या)
उत्तेजनार्थ-वेदिका देवरे
स्वामी विवेकानंद स्कूल अमळनेर
(साराह कस)
शिक्षक गट
प्राथमिक
प्रथम-उमेश अमृत पाटील
शांतीनिकेतन प्राथमिक शाळा अमळनेर
द्वितीय
तस्लिम बानोएस अहमद
जिल्हा परिषद शाळा सारबेटे
तृतीय
अनिता बि-हाळे
जि.प.शाळा मांडळ बाईज
माध्यमिक
प्रथम
डि.डी.धनगर
शिरसाळे हायस्कूल
द्वितीय
डी.एन.पाटील
एन.टी.मुंदडा हायस्कूल
तृतीय
माधुरी पाटील
जय योगेश्वर माध्यमिक विदयालय
प्रयोगशाळा परिचर
प्रथम-रंगराव पाटील कै.श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विदयालय भरवस..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.









