1 min read

पारंबी विद्यालयात सायबर क्राईम अवेअरनेस या विषयावर व्याख्यान संपन्न

Loading

पारंबी विद्यालयात सायबर क्राईम अवेअरनेस या विषयावर व्याख्यान संपन्न

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तालुका मुक्ताईनगर येथे महाराष्ट्र सायबर सेल आणि क्लिक हिल फाउंडेशन तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थिनीनी सायबर क्राईम अवेअरनेस या विषयावर कु.शुभांगी विनायक बोंडे व कु.शुभांगी युवराज चौधरी या विद्यार्थिनींनी नुकतेच इयत्ता आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक डॉ.शिवचरण उज्जैनकर होते प्रसंगी स्नॅप शॉट, स्टेटस, व्हाट्सअप, फोटो शेअरिंग, इंस्टाग्राम, पासवर्ड, स्कॅनर ,फ्री फायर , ऑनलाइन शॉपिंग, ॲमेझॉन, गिफ्ट शॉप, फ्लिपकार्ड या विषयावर उदाहरणासह त्यांनी मार्गदर्शन केले व्हाट्सअप वापरताना विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घ्यावी आपला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट कोणालाही पाठवू नये पासवर्ड कोणालाही देऊ नये डीनाय करावे अलो करू नये कुठलेही ॲप युज करू नका त्यापूर्वी आई-वडिलांची किंवा घरातील मोठ्यांची परमिशन घ्यावी मोबाईल हा चांगला आहे परंतु त्यातून अनेक वाईट गोष्टी निर्माण होत असतात त्याचीही आपण काळजी घ्यावी इंटरनेट एडिक्शनचे प्रमाण मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस खूप वाढत आहे यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे याप्रसंगी शिक्षक श्री सुनील पाटील श्री सुनील नानगे शिक्षकेतर श्री रघुनाथ इंगळे श्री विनायक इंगळे व इयत्ता आठवी, नववी व दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी श्री सुनील पाटील सर यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *