1 min read

धरणगावात शिंदे गटातर्फे पत्रकारांचा सन्मान..

Loading

धरणगावात शिंदे गटातर्फे पत्रकारांचा सन्मान..

पत्रकारिता निर्भिड व निष्कलंक असली पाहिजे; मेजर डी एस पाटील

धरणगाव प्रतिनिधी -पी.डी. पाटील सर

धरणगाव : धरणगाव शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांचा शिवसेना (शिंदेगट) तर्फे संपर्क कार्यालयात सत्कार – सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या तत्पूर्वी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मेजर डी एस पाटील, ॲड. व्ही एस भोलाणे, बी आर माळी, धर्मराज मोरे, राजेंद्र रडे, विजयकुमार शुक्ला, कल्पेश महाजन, विकास पाटील, रविंद्र महाजन, निलेश पवार, विनोद रोकडे, भगीरथ माळी, सतिष बोरसे, हर्षल चौहाण, सतिष शिंदे, कमलेश पाटील, योगेश एन पाटील, योगेश पी पाटील, विजय पाटील, अविनाश बाविस्कर, बाळासाहेब जाधव, राजेंद्र वाघ यांसह शिंदे गटाचे पी एम पाटील, विनय भावे, वासुदेव चौधरी, महेंद्र (भैय्या) महाजन, विलास महाजन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत माल्यार्पण केले. तद्नंतर संजय चौधरी, बुट्या पाटील, तौसिफ पटेल, राजू महाजन, वसीम पटेल, आदी मान्यवरांच्या हस्ते सर्व पत्रकारांना वही, पेन व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार डी एस पाटील, ॲड. भोलाणे, बी आर महाजन, भगीरथ माळी, विजय पाटील, निलेश पवार, राजेंद्र वाघ यांनी पत्रकार दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करून आयोजकांनी आमचा सन्मान सोहळा केल्याबद्दल धन्यवाद दिले. पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यास असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र महाजन यांनी तर आभार वाल्मीक पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *