1 min read

जे.एस पी एम एनटीसी एमबीए विभाग यांच्या वतीने वृक्षारोपण

Loading

जे.एस पी एम एनटीसी एमबीए विभाग यांच्या वतीने वृक्षारोपण

लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य , वनविभाग लोणी काळभोर च्या माध्यमातून एक लाख वृक्ष लागवड प्रकल्प राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच दि.१० जानेवारी २०२३ रोजी. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे
जे.एस पी एम एनटीसी एमबीए विभाग नर्हे टेक्निकल कॅम्पस पुणे~४१ यांच्या माध्यमातून ५१ जंगली ,फळझाडे या मध्ये फणस,उंबर,कंरज,बकुळ,नारळ,भेडी,वड या वृक्षाचे रोपण करण्यात आले. या मध्ये १०० विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या वेळी वनविभाग पुर्व हवेली वनविभाग अधिकारी श्री.मगेश सपकाळे यांनी विद्यार्थीना वृक्षारोपण विषयावर मार्गदर्शन केले मानव आणि निसर्ग यांचा संबंध हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. निसर्गातूनच माणसाचा जन्म झालाय आणि याच निसर्गातून माणसाच्या सर्व गरजा पूर्ण होतात. निसर्गात माणसाला आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होऊ लागली. त्यामुळे मनुष्य जीवन जगणे सोपे झाले. तसेच या निसर्गातील सर्वात मोठी देणगी म्हणजे झाडे. झाडे आहेत म्हणून आज आपण या पृथ्वीतलावर सुखरूप राहू शकतो. कारण या झाडांपासून आपल्याला जीवनावश्यक असलेल्या प्राणवायू मिळतो. त्यामुळे माणसाच्या जीवनात झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे । आळविती ।।
येणे सुख रुचे एकांताचा वास ।
नाही गुणदोष । अंगी येत ।। “
झाड हे आपल्या निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे. वृक्ष आपल्या निसर्गाची शोभा वाढवतात. पर्यावरणाला, निसर्गाला झाडांमुळे सौंदर्य प्राप्त होते अशी माहिती वनविभाग अधिकारी मंगेश सपकाळे यांनी दिली.
या वेळी जे एस पी एम चे श्री.ॠषीराज सावंत कॅम्पस डायरेक्टर व ट्रस्टी श्री.एस.ए.चौधरी डायरेक्टर श्री.जयंत कुलकर्णी विभाग प्रमुख तसेच पुर्व हवेली वनविभाग अधिकारी श्री. मगेश सपकाळे,लोणी काळभोर वनरक्षक अंकुश कचरे साहेब,वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज काळभोर, ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेडगे, सागर काळभोर, नितीन तात्या काळभोर, प्रविन जाधव ,विनोद यादव, बिरूदेव भास्कर तसेच जे एस पी एम नर्हे ,ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग लोणी काळभोर, वनव्यवस्थापन समिती लोणी काळभोर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *